ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करत भारती सिंहने साजरा केला लग्नाचा तिसरा वाढदिवस

Published on
Updated on

मुंबई : पुढारी ऑनलाईन

कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया यांनी गुरुवारी (३ डिसेंबर) रोजी आपल्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने भारतीने हर्षसोबतचे काही रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  

भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया दोघांनी एकमेकांना लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीने लग्नातील विधींचे न पाहिलेले आणि प्री-वेडिंग फोटो शेअर केले आहे. भारतीने या फोटोसोबत एक कॅप्शन लिहिली आहे की, 'तुम्ही किती दिवस, महिने किंवा किती वर्ष एकमेकांसोबत आहात यावर प्रेम अवलंबून नसते. तर एका दिवसात तुम्ही प्रेमाचा किती वर्षाव करता यावर खरे प्रेम ठरलेले असते'. 

अधिक वाचा : आगामी 'छूमंतर' मधील प्रार्थना बेहरेचं फोटोशूट

भारतीची या पोस्टनंतर हर्षनेदेखील भारतीला भटके शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोसोबत हर्षने एक कॅप्शन लिहिली आहे की, 'एक चांगले लग्न म्हणजे आपल्याला सापडणारी वस्तू नसते, ते आपण बनवत असतो आणि ते आपल्याला टिकवून ठेवायचे असते. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा भारती सिंह.'

अधिक वाचा : शीतल आमटेंच्या आत्महत्येनंतर मयुरी देशमुखचा 'तो' व्हिडिओ व्हायरल

ड्रग्ज प्रकरणात अडकल्यानंतर भारती आणि हर्ष पहिल्यांदा २ डिसेंबर रोजी आदित्य नारायणच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये दिसले होते. यावेळी दोघांनी डान्सही केला होता. या व्डिडिओवरून दोघांना ट्रोल देखील केले गेले होते. या ट्रोलकडे दुर्लक्ष करून दोघांनी लग्नाचा वाढदिवस साजरा केला.  

(photo : bharti.laughterqueen, haarshlimbachiyaa30 instgram वरून साभार)


 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news