Saif Ali Khan | 'सैफ अली खानने माझे आभार मानले, शर्मिला टागोरनी आशीर्वाद दिले'

चाकू हल्ल्यानंतर सैफला ऑटो-रिक्षाचालक भजन सिंहने रुग्णालयापर्यंत पोहोचवले होते
Saif Ali Khan, Bhajan Singh
नुकतीच ऑटो-रिक्षा चालक भजन सिंहने सैफ अली खानची रुग्णालयात भेट घेतली.(Image source- Filmfare X account)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याला मंगळवारी (दि.२१) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. १६ जानेवारीच्या पहाटे सैफवर जीवघेणा चाकू हल्ला झाला होता. लीलावती रुग्णालयात त्याच्यावर पाच दिवस उपचार करण्यात आले. दरम्यान, सैफ याच्यावरील हल्ला प्रकरणी पोलिसांनी ठाण्यातील घोडबंदर येथील हिरानंदानी इस्टेट भागातील कांदळवन परिसरात लपून बसलेल्या मोहम्मद शरीफूल इस्लाम या हल्लेखोराला अटक केली.

दरम्यान, १६ जानेवारीच्या पहाटे ऑटो-रिक्षा चालक भजन सिंहने (Bhajan Singh) सैफला रुग्णालयापर्यंत पोहोचवले होते. नुकतीच भजनने सैफची रुग्णालयात भेट घेतली. सैफने भजनची त्याच्या आईशी (शर्मिला टागोर) ओळख करून दिली. यावेळी सैफ अली खानची आई शर्मिला टागोर यांनीही भजनचे आभार मानले आणि त्याला आशीर्वादही दिले.

'सैफने माझे आभार मानले, शर्मिला टागोरनी आशीर्वाद दिले'

सैफ अली खान आणि त्याच्या कुटुंबाला भेटल्यानंतर ऑटो-रिक्षा चालक भजन सिंह म्हणाला, "त्याने माझे आभार मानले. त्यांच्या आईने आणि संपूर्ण कुटुंबाने मी चांगले काम केल्याबद्दल माझे कौतुक केले. मला धन्यवाद दिले. मी त्यांच्या आईंना भेटलो आणि त्याचे आशीर्वाद घेतले. मला खूप आनंद झाला. कारण मला इतक्या मोठ्या अभिनेत्याला भेटता आले. त्या पहाटेच्यावेळी मी पैशाचा अथवा इतर कशाचाही विचार केला नाही. मला केवळ त्यांचा जीव वाचवायचा होता..." अशी भावना त्याने व्यक्त केली आहे.

वांद्रे येथील ११ व्या मजल्यावरील आलिशान घरात १६ जानेवारीच्या पहाटे हल्लेखोराने केलेल्या चाकू हल्ल्यात अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan Attack News) गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर लीलावती रुग्णालयात सलग दोन मोठ्या शस्त्रक्रिया केल्यानंतर त्याच्या जीवाला आता कोणताही धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्याला पाच दिवसांच्या उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला.

त्यांच्या हाताला दोन आणि एक मानेला जखम झाली होती. जी प्लास्टिक सर्जरीने बरी करण्यात आली आहे. त्याच्या पाठीचा मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून मणक्यातील एक धारधार वस्तू बाहेर काढली.

Saif Ali Khan, Bhajan Singh
डंकी फेम अभिनेता Varun Kulkarni ची प्रकृती गंभीर, किडनीशी संबंधित आजाराशी लढा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news