‘ईडी’ची दिनो मोरिया, अहमद पटेलांचे जावई इरफान सिद्दिकींवर कारवाई

Published on
Updated on

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : संदेसरा घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अभिनेता दिनो मोरिया आणि अहमद पटेल यांचा जावई इरफान अहमद सिद्दिकी यांच्यावर कारवाई केली आहे. 'ईडी'ने दिनो मोरिया यांची १ कोटी ४  लाख तर इरफान अहमद सिद्दीकी यांची २.४१ कोटींची संपत्ती जप्‍त केली आहे.गुजरातमधील उद्योजक संदेसरा बंधूंनी तब्बल १४हजार ५०० कोटींचे कर्ज घेत बँकांना गंडा घातला होता. 

 

अधिक वाचा : नुकतचं लग्न झालेल्या यामी गौतमला ईडीची नोटीस!

स्टर्लिंग बायोटेक लिमिटेड, संदेसरा ग्रुप आणि प्रमोटर नितिन संदेसरा, चेतन संदेसरा आणि दिप्ती संदेसरा यांनी देशातील विविध बँकांची १४ हजार ५०० कोटींची आर्थिक फसवणूक करून पलायन केले होते. या आरोप प्रकरणी स्टर्लिंग बायोटेक घोटाळ्यासंदर्भात बॉलिवूड अभिनेता दिनो मोरियाला समन्स बजावले होते.

अधिक वाचा : तरुणींची 'दिल की धडकन' असलेला टॉम क्रूज कसा बनला हॉलिवूडचा सुपरस्टार?

स्टर्लिंग बायोटेकचे मालक असलेले संदेसरा बंधू  चेतन जयंतीलाल संदेसरा आणि नितीन जयंतीलाल संदेसरा यांच्यावर खोट्या कंपन्या दाखवून बँकाकडून कर्ज लाटल्याचा आरोप आहे. ऑक्टोबर २०१७ मध्ये सीबीआयने एफआयआर दाखल केल्यानंतर ईडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. यामध्ये दिनो मोरिया आणि इरफान सिद्दीकी यांनी या कंपनीशी काही व्यवहार केल्‍यामुळे या दोघांची नावे समोर आली. या घोटाळ्याची व्याप्ती 'पीएनबी'पेक्षाही मोठी असल्याचा दावा 'ईडी'ने केला होता.

अधिक वाचा : मलायकाची डुप्लिकेट माहित आहे का? (photos)

 दिनो मोरियाने १९९९ च्या 'प्यार में कभी-कभी' या चित्रपटातून डेब्यू केले होते. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काळ टिकू शकला नाही. यानंतर मात्र डिनो आणि बिपाशाचा २००२ ला 'राज' हा चित्रपटाने धुमाकूळ घातला. यानंतर दिनो मोरियाचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होवू लागले. दिनो मोरियाने शेवटच्या 'अलोन' (२०१५)या चित्रपटात कॅमियोची भूमिका साकारली होती.   

 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news