

मुंबई : असरानी' म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते-दिग्दर्शक गोवर्धन असरानी यांचे आज मुंबईत दीर्घ आजाराने निधन झाले. सांताक्रूझ स्मशानभूमीत त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले. एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार त्यांचे निधन हे दिर्घ आजाराने झाले आहे.
84 वर्षीय अभिनेते यांचे आज दिवाळी दिवशी निधन झाले आहे. ते गेले अनेक दिवस आजारी होते 5 दिवसांपूर्वी त्यांच्या कुंटुंबियांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. पण उपचारांना त्यांनी प्रतिसाद दिला नाही. आज सोमवारी 20 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी त्यांनी अंतिम श्वास घेतला.
‘हम अंग्रेज के जमाने के जेलर है’
अभिनेते असरानी यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक अजरामर भुमिका केल्या. यात हिंदी चित्रपटसृष्टीतील माईलस्टोन ठरलेल्या शोले पिक्चरमधील जेलर ची भूमिका हे आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. ‘हम अंग्रेज के जमाने के जेलर है’ असे म्हणून खूप शूरवीर असल्याचे भासवणारे व प्रत्यक्षात वेगळेच असणारे पात्र आजही जसेच्या तसे लोकांना आठवते. त्याचे रिल्स अजूनही व्हायरल होतात.