

पुढारी ऑनलाईन डेस्क : अर्जुन कपूर याने बॉलीवूडमध्ये भक्कम स्थान निर्माण केले आहे. मलायका अरोराशी ब्रेकअप झाल्यानंतर त्याच्याकडे खूपच वेळ मोकळा आहे. यादरम्यान तो मुलाखती देताना दिसत आहे. नुकतेच त्याने बॉलीवूड पदार्पण केलेल्या 'इशकजादे' सिनेमादरम्यानचा एक गमतीदार प्रसंग सांगितला आहे.
या चित्रपटात अर्जुनसोबत बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ही प्रमुख भूमिकेत झळकली होती. मात्र, अर्जुन तिच्या कास्टिंगवर खुश नव्हता. अर्जुन म्हणाला की, परिणीती मला खूप बोलकी मुलगी वाटत होती, त्यामुळे तिला 'इशकजादे 'मध्ये कास्ट करावे, असे मला वाटत नव्हते. परिणीतीला चित्रपटासाठी कास्ट करण्यात आले, त्यावेळी मला अजिबात आनंद झाला नाही. परिणीती खूप बडबड करत असल्याने मी तिच्या कास्टिंगला विरोध केला, परिणीती येताच मी एक गंमत सांगितली; पण त्यावर हसण्याऐवजी विचित्र वागली? मला आश्चर्य वाटले की, ती यावर हसू शकली नाही,
परिणीती ही चँटवर इमोजीमध्ये बोलायची. संदेश पाठविताना ती बालिश ईमोजी वापरायची. त्यामुळे ती कामाबद्दल गंभीर नसल्याचे मला वाटू लागले. 'इशकजादे' मधील परिणीतीच्या पात्राचे नाव झोया होते. तिला भेटण्यासाठी सहा महिने वाट पाहत होतो, पण झोया सेटवर आली की, काही तरी विचित्र वागत होती.