पुढारी ऑनलाईन डेस्क : एकीकडे 'इंडियाज गॉट लेटेंट' शोबद्दल खूप वाद सुरू आहे. रणवीर इलाहाबादिया आणि समय रैना यांनाही शोवरील त्यांच्या टिप्पण्यांमुळे टीकेचा सामना करावा लागत आहे. या शोमध्ये विनोदी कलाकार अनुभव सिन्हा बस्सी देखील दिसला आहे. या वादाची ठिणगी आता विनोदी कलाकार अनुभव सिन्हा बस्सी यांच्या कामापर्यंत पसरली आहे. शनिवारी लखनौमध्ये होणारा त्यांचा कार्यक्रम आता रद्द करण्यात आला आहे. स्टँड-अप कॉमेडी शो व्यतिरिक्त, 'तू झुठी मैं मक्कर' चित्रपटातील अभियनासाठीही बस्सीला देखील ओळखतात.
अनुभव सिन्हाचा शो लखनऊमधील गोमती नगर येथील इंदिरा गांधी प्रतिष्ठानमध्ये दुपारी ३.३० आणि संध्याकाळी ७ वाजता होणार होता. पोलिस शोमध्ये पोहोचले आणि लखनौ विकास प्राधिकरणाने विनोदी कलाकाराला परत पाठवले. हा वाद शोमध्ये वापरल्या जाणाऱ्या भाषेबद्दल आणि आशयाबद्दल आहे.
या कार्यक्रमाबाबत, उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्षा अपर्णा यादव यांनी डीजीपी प्रशांत कुमार यांना पत्र लिहून विनंती केली होती की, या कार्यक्रमांमध्ये महिलांची प्रतिमा मलिन होणार नाही याची खात्री करावी किंवा शाे पूर्णपणे रद्द करण्याचा विचार करावा. उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्षा अपर्णा यादव यांनी डीजीपी प्रशांत कुमार यांना पत्र लिहून शोमध्ये शिष्टाचार राखण्याचे आवाहन केले. १४ फेब्रुवारी रोजी लिहिलेल्या या पत्रात मागील कार्यक्रमांमध्ये अयोग्य भाषेचा वापर अधोरेखित करण्यात आला होता. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये शिष्टाचार राखण्याची गरज यावर भर देण्यात आला होता.
"१५ फेब्रुवारी रोजी लखनऊ येथील इंदिरा गांधी प्रतिष्ठान येथे अनुराग सिंह बस्सी यांचा कॉमेडी शो आयोजित केला जात आहे हे माहिती आहे. यूट्यूब चॅनलवरील त्यांचे मागील शो पाहिल्यानंतर असे आढळून आले आहे की त्यांच्या शोमध्ये आक्षेपार्ह शब्द वापरले गेले आहेत, म्हणून कृपया तुम्ही खात्री करावी की या प्रस्तावित कार्यक्रमात आणि स्टँड-अप कलाकारांच्या तत्सम कार्यक्रमांमध्ये, कोणतेही आपेक्षार्ह शब्द वापरले जाणार नाहीत किंवा महिलांबद्दल कोणत्याही अश्लील टिप्पण्या केल्या जाणार नाहीत, शक्य असल्यास असे शो रद्द करावेत आणि भविष्यात त्यांना परवानगी देऊ नये, असेही अनुभव सिन्हा बस्सीचा याने म्हटलं आहे.