

अनन्या पांडे तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. नुकतेच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही ग्लॅमरस बिकिनी फोटोज पोस्ट केले आहेत, ज्यामुळे सोशल मीडियावर धुमाकूळ उडाला आहे.
अनन्या या फोटोंमध्ये पिंक आणि ऑरेंज कलरची बिकिनी परिधान करून आपली टोन्ड बॉडी दाखवताना दिसते. तिचे मोकळे केस आणि नैसर्गिक मेकअप लूक तिला आणखी सुंदर बनवतोे. तिने काही सेल्फीजही शेअर केल्या आहेत, ज्यात ती रेड बिकिनी आणि साध्या मेकअपमध्ये दिसत आहे. तसेच काही सनकिस्ड फोटोजमध्ये ब्ल्यू चेक टॉप परिधान करून तिने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. चाहत्यांनी तिला ‘ब्यूटी क्वीन’ असेही संबोधले आहे. तिचा ग्लॅमरस अंदाज पाहून अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने सुद्धा तिच्या सौंदर्याची प्रशंसा केली आहे. दरम्यान, अनन्याचा आगामी चित्रपट ‘तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी’ 25 डिसेंबरला रीलिज होणार आहे. यात कार्तिक आर्यनदेखील?आहे. या चित्रपटाचे शूटिंग युरोपमधील क्रोेएशिया येथे झाले आहे. करण जोहर या चित्रपटाचा निर्माता आहे.