बिग बींचा रूग्णालयातून चाहत्यांना ‘हा’ सल्ला 

Published on
Updated on

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यामुळे त्याच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या अमिताभ यांच्या प्रकृतीत  सुधारणा होत आहे. ते सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असून सतत अपडेट देत आहेत. तर सध्या अमिताभ बच्चन यांनी रुग्णालयातून आपल्या इंन्स्टाग्रामवर काही उपयुक्त गोष्टी शेअर केल्या आहेत.

वाचा : 'हे' आहे कॅटच्या सुंदर त्वचेचे रहस्य! 

अमिताभ बच्चन यांनी इंन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये अमिताभ यांनी ६ प्रकारच्या सवयी असलेले लोक कधीही आनंदी किंवा सुखी राहू शकत नसल्याचे सांगितले आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये अमिताभ यांनी लिहिले आहे की, 'जे लोक ईर्ष्या, असंतुष्ट, असमाधानी, संतप्त, नेहमीच संशयास्पद किंवा इतरांवर अवलंबून असलेले जीवन जगतात ते लोक नेहमीच दु: खी असतात. तसेच आपण सर्वांनी या गोष्टींपासून दूर रहावे.'

वाचा : बिग बींच्या प्रकृतीत सुधारणा

याआधी अमिताभ बच्चन यांनी देशभरातून चाहत्यांकडून मिळत असलेल्या प्रेमाचे, शुभेच्छांबद्दल आभार व्यक्त केले होते. अमिताभ बच्चन यांनी स्वत: कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले होते. यानंतर अमिताभ यांचा मुलगा अभिषेक बच्चनला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. तर सध्या दोघेही कोरोनावर रूग्णालयात उपचार घेत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रॉय आणि आराध्या या दोघेही होम क्वारंनटाईन आहेत. तर जया बच्चन यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. 

(photo : amitabhbachchan instagram वरून साभार)

   

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news