अमिताभ यांच्या ‘अग्निपथ’ला ३१ वर्षे पूर्ण तर बॉलिवूडमध्ये ५२ वर्षे पूर्ण

Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे प्रसिद्ध नाव विजय दीनानाथ चौहान या संवादाने चित्रपट अग्निपथ हिट ठरला. आज १६ फेब्रुवारी रोजी अग्नपथला ३१ वर्षे पूर्ण झाली. विशेष म्हणजे या चित्रपटातील बिग बींनी साकरलेली विजय ही भूमिका इतकी गाजली की, पुढे 'पूरा नाम विजय दीनानाथ चौहान…'हा संवाद गाजलाचं, शिवाय तब्बल २० चित्रपटांमध्ये त्यांचे नाव 'विजय' असे आहे. तर अमित हे सर्वाधिक वेळा वापरले गेलेले नाव आहे. अमिताभ यांच्‍या अग्‍निपथरबरोबरचं डॉन, जंजीर या गाजलेल्‍या चित्रपटांचे रिमेक बनवण्‍यात आलेले आहेत. 

अग्निपथ १६ फेब्रुवारी, १९९० रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुकुल आनंद यांनी केले होते. अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत तर मिथुन चक्रवर्ती, माधवी (अभिनेत्री),  नीलम, डॅनी डेन्जोंगपा, आलोक नाथ, रोहिणी हट्टंगड़ी, टिन्नू आनंद, विक्रम गोखले, अर्चना पूरन सिंह, शरत सक्सेना, गोगा कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका यामध्ये होत्या.

चित्रपटाचे निर्माते यश जोहरने होते. चित्रपटाचे नाव अग्निपथ कवितेतून घेण्यात आले होते. हे नाव हिंदीचे प्रसिद्ध कवी हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेतून घेण्यात आले होते. अग्निपत म्हणावा तसा चालला नाही. तिकिट खिडकीवर अयशस्वी  ठरलेल्या या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या अभिनयावर टीका झाली. परंतु, मिथुन चक्रवर्तीच्या अभिनयाला समीक्षक आणि प्रेक्षक दोघांकडून दाद मिळाली होती. असे असले तरी अमिताभ बच्चन यांच्या करिअरच्या दृष्टीने हा चित्रपट मैलाचा दगड ठरला होता. दमदार संवाद आणि उत्तम अदाकारीमुळे अग्निपथ १९९० मधील सर्वात चौथा कमाई करणारा चित्रपट ठरला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, चित्रपटाची कहाणी खूप उत्तम होती, असे असतानाही हा चित्रपट आपला बजेटदेखील या चित्रपटाच्या माध्यमातून काढू शकला नाही. आणि बॉक्स ऑफिस पर अयशस्वी ठरला. 

बिग बींना मिळाला होता पहिला राष्ट्रीय पुरस्कार 

अग्निपथसाठी अमिताभ बच्चन यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. ३८ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सर्नोत्कृष्ट अभिनेता म्हणून सन्मानित करण्यात आले होते. 

२०१२ मध्ये आला अग्निपथचा रिमेक 

मूळचा चित्रपट अग्निपथ रिलीज झाल्यानंतर २२ वर्षांनंतर २०१२ मध्ये रिमेक आला. या चित्रपटामध्ये संजय दत्त, ऋतिक रोशन, ऋषी कपूर, प्रियांका चोप्रा यांच्या भूमिका होत्या. हा रिमेक मूळच्या अग्निपथच्या तुलनेत कमर्शियली हिट ठरला होता. 

बॉलिवूडमध्ये ५२ वर्षे पूर्ण 

अमिताभ यांना बॉलिवूड इंडस्ट्रीत ५२ वर्षे पूर्ण झाली आहेत. बिग बींनी आपल्या जुन्या आठवणी शेअर करत थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांनी ट्विट करून म्हटले की, आजच्याच दिवशी (१५ फेब्रुवारी) त्यांनी चित्रपट इंडस्ट्रीत पाऊल ठेवले होते. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news