

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा मिळत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दाक्षिणात्य दिग्दर्शक सुकुमार केले आहे. सुकुमार यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला अनेक उत्तम प्रत्येक वेळी अल्लू हा सुकुमार यांच्यासाठी लकी ठरला आहे. मध्ये पहिल्यांदा अल्लू आणि सुकुमार यांनी 'आर्या' चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटातील अल्लूच्या अभिनयाने सर्वांना भुरळ घातली. तसेच सुकुमार यांच्या दिग्दर्शनाचेही सर्वांनी कौतुक केले. चार कोटी रुपयांच्या बजेटमध्ये निर्मिती केलेल्या या सिनेमाने सुमारे ३० कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. त्यानंतर पाच वर्षांनंतर अल्लू आणि सुकुमार यांनी 'आर्या-२' या सिनेमाची निर्मिती केली आणि तोही सुपरहिट ठरला. त्यानंतर १२ वर्षांनी म्हणजेच २०२१ मध्ये 'पुष्पा: द राईज' या चित्रपटाद्वारे दोघे एकत्र आले. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ३९५ कोटी रुपयांची दमदार कमाई केली. तीन सुपरहिट सिनेमे दिल्याने अल्लू हा सुकुमार यांच्यासाठी लकी असल्याचे बोलले जात आहे.