

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिच्या आगामी बहुप्रतिक्षित ॲक्शन ड्रामा 'जिगरा' चित्रपट लवकरच येत आहे. चित्रपटातील आलिया आणि तिचा भावाचा लूक सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते. यानंतर आता चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज करण्यात आला आहे. यामुळे चित्रपटासाठी चाहत्यांची प्रतिक्षा शिगेला पोहोचली आहे.
अभिनेत्री आलिया भट्टच्या इन्स्टाग्रामवर नुकतेच आगामी 'जिगरा' चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला आहे. यात आलिया सुरूवातील एक हॉटेलमध्ये असून मिस्टर भाटियाला तिचा भूतकाळ सांगताना दिसत आहे. यावेळी तिने आपल्या आयुष्यात आई- वडिल नसून एकच भाऊ असल्याचे सांगताना दिसते. तसेच नातेवाईकांनी तिची कशी फसवणूक केली यावरही ती बोलताना दिसली. आलियाचा टिझरमध्ये एक वेगळाच अवतार पाहायला मिळाला. याच दरम्यान आलिया भाटियाला म्हणते की, आयुष्याची कथा खूपच मोठी आहे मात्र वेळ फार कमी आहे. आलिया भाऊ वेदांगला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसली.
या चित्रपटात आलियासोबत अभिनेता वेदांग रैनाही दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक वासन बाला यांनी केलं आहे. हा चित्रपट ११ ऑक्टोबर २०२४ रोजी सिनेमागृहात दाखल होत आहे. यामुळे आणखी एका चित्रपटात आलियाला पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. १ तासांत २ लाखांहून अधिक जणांनी सोशल मीडियावर टिझर पाहिला आहे.