

आलिया भटचा आगामी 'जिगरा' हा सिनेमा ११ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या हिंदी ट्रेलरला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता तेलुगूमध्येही सिनेमा प्रदर्शित होणार आहे. दाक्षिणात्य रामचरण आणि दिग्दर्शक राजामौली यांनी 'जिगरा' या सिनेमाच्या तेलुगू ट्रेलरचे रीलिज केले. रामचरणने नुकतेच 'जिगरा' या सिनेमाचा तेलुगू ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करत लिहिले की, हा ट्रेलर तुम्हाला भावनाप्रधान मार्गावर घेऊन जाणार आहे. आलिया आणि संपूर्ण टीमसाठी खूप आनंदाची ही बाब आहे. आलियाच्या 'जिगरा' या सिनेमाला दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही खूप प्रेम मिळत आहे. यानंतर आलियाने रामचरण आणि राणाचे आभार मानले. 'जिगरा' हा सिनेमा बहीण आणि भावाच्या नात्यावर बेतलेला आहे. यामध्ये आलियाने सत्या आणि वेदांग रैनाने अंकुर ही विदेशातील जेलमध्ये रक्षणासाठी बहीण याची 'जिगरा' ही भूमिका साकारली आहे.
अडकलेल्या भावाच्या रक्षणासाठी बहिण कोणत्या थराला जाते, याची जिगरा 'ही' कथा आहे. वसंत बाला यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून आलियाने याची निर्मिती केली आहे. दिग्दर्शक करण जोहरही सहनिर्माता आहे.
आलियाने राजामौली यांच्या 'आरआरआर' सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. यामध्ये तिची रामचरणसोबत भूमिका होती. तेव्हापासूनच आलियाचे त्याच्याशी चांगले संबंध आहेत.