मुंबई ः पुढारी ऑनलाईन
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातले आहे. महाराष्ट्रात तर धुमाकूळ घातलेला होता. कारण, नुकतीच सिनेमागृहे उघडत होती तेवढ्यात दुसऱ्या लाटेत संक्रमण वाढले. सध्या कोरोनाची परिस्थिती ठिकठाक होण्याच्या वाटेवर असताना दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी आपापली चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी कंबर कसली आहे. अभिनेता अक्षय कुमारने 'बेल बाॅटम' चित्रपटाची तारीख जाहीर केलेली आहे आणि असंही ऐकण्यात येत आहे की, लवकरत 'सुर्यवंशी' चित्रपटाची तारीख जाहीर केली जाईल.
वाचा ः सिमरन कौरचे बोल्ड फोटो पाहून चाहते घायाळ
अक्षय कुमार आणि रोहित शेट्टीचा 'सुर्यवंशी' चित्रपट गांधी जयंती दिवशी सिनेमागृहात थडकणार आहे. फिल्म डिस्ट्रिब्युटर्स आणि एग्जिबिटर्स यांनी निर्यण घेतला आहे की, एक-एक करून बिग बजेट असणारी चित्रपटे रिलीज केली केली जाणार आहे, जेणे करून जास्तीत जास्त फायदा होऊ शकेल. सूर्यवंशी चित्रपटाचे रिलीज वर्ष २०२० पासून अडकलेली आहे. फिल्ममेकर्स यांनी डिस्ट्रीब्युटर्स यांना सोबत घेऊन प्लॅन तयार केलेला आहे की, २ ऑक्टोबरचे निमित्त साधून सिनेमागृहात पाऊल ठेवतील जेणे करून सर्व रेकाॅर्ड तोडता येतील.
वाचा ः 'इंडियन आयडल'च्या सेलिब्रिटींना ओळखता का?
जर अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ यांचा सूर्यवंशी चित्रपट २ ऑक्टोबर दिवशी रिलीज झाली, तर कंगणा राणावतला मोठी अडचण ठरणार आहे. कारण, कंगणानेदेखील यापूर्वीच तिची एक्शन फिल्म 'धाडक' गांधी जयंतीच्या दिवशीच रिलीज केली जाईल, अशी घोषणा केली होती. तिच्या फिल्ममध्ये अर्जुन रामपालदेखील दिसणार आहे. त्यामुळे सूर्यवंशी आणि धाकड एकाच दिवशी रिलीज झाली, प्रेक्षकांनी चांगलंच आहे. पण, फिल्म डिस्ट्रीब्युटर्स आणि सिनेमागृहांच्या मालकांचं टेन्शन वाढेल. दोन दिग्गजांच्या फिल्म एकाच दिवशी रिलीज होणं म्हणजे कोरोना काळातील नुकसानीत आणखी भर पडणार आहे.