Khel Khel Mein collection : अक्षयच्या 'खेल खेल में'ची धिम्या गतीने वाटचाल

अक्षयच्या 'खेल खेल में'ची पहिल्या दिवशी धिम्या गतीने वाटचाल
Khel Khel Mein collection
अक्षयच्या 'खेल खेल में'ची पहिल्या दिवशी धिम्या गतीने वाटचाल Khel Khel Mein collection
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडची खिलाडी अक्षय कुमार, वाणी कपूर, फरदीन खान, तापसी पन्‍नू, एमी विर्क यांचा 'खेल खेल में' चित्रपट काल स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर रिलाज झाला. या चित्रपटाला टक्कर देण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावचा हॉरर-कॉमेडी 'स्त्री २' आणि बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम, शरवरी वाघ यांचा 'वेदा' हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी रिलीज झाले. तिन्ही चित्रपटाने चाहत्यांची पसंती दर्शविली, मात्र, 'स्त्री २' चित्रपटाने बाजी मारत बॉक्स ऑफिसवर ५४ कोटींची भरघोष अशी कमाई केली. तर दुसरीकडे कमाईच्या बाबतीत अक्षय कुमारच्या कॉमेडी 'खेल खेल में' मागे पडत गेला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धिम्या गतीने वाटचाल केली आहे.

स्वातंत्र्यदिनी म्हणजे, १५ ऑगस्टला काल 'खेल खेल में', 'स्त्री २' आणि 'वेदा' तिन्ही चित्रपट रिलीज होताच चाहत्यांनी आनंद द्विगुणीत झाला. मात्र, खास करून चाहत्यांनी 'स्त्री २' चित्रपटाला पसंती दर्शविली. तर दुसरीकडे यांचा फटका अक्षय कुमारच्या कॉमेडी 'खेल खेल में' चित्रपटा बसला. या चित्रपटाने पहिला दिवशी धिम्या गतीने सुरूवात केली.

फक्त 5 कोटी रुपयाची कमाई

रिपोर्टच्या माहितीनुसार, 'खेल खेल में' फक्त 5 कोटी रुपयाची कमाई केली आहे. हिंदीत पहिल्या दिवशी 'खेल खेल में' ने ४०.२६ टक्केचा व्यवसाय केला. अनेक चाहत्यांनी चित्रपटाचा रात्रीचा शो पाहण्यास पसंती दर्शविली आहे. मुंबईत या चित्रपटने ३५२ शोमध्ये प्रदर्शित झाले आहेत.

बॉक्स ऑफिसवर 'खेल खेल में' ने दमदार कामगिरी केली नसली तरी याधीच्या पहिल्या दिवशीच्या कामगिरीत अक्षय कुमारच्या अनेक चित्रपटाना मागे टाकलं आहे. यात सरफिरा ( २.४ कोटी), मिशन रानीगंज (२.८ कोटी), सेल्फी (२.५ कोटी) आणि बेलबॉटम (२.७ कोटी) या चित्रपटाना मागे टाकलं आहे.

या चित्रपटाची मिर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, विपुल डी. शाह, अश्विन वर्दे, राजेश बहल, शशिकांत सिन्हा आणि अजय राय यांनी केली आहे. चित्रपटात अक्षय कुमारसोबत तापसी पन्नू, वाणी कपूर, एमी विर्क, प्रज्ञा जैस्वाल आणि आदित्य सील यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तर दुसरीकडे अक्षय कुमारने 'स्त्री 2' मध्येही कॅमिओ रोल केला आहे.

Khel Khel Mein collection
‘कल खेल में हम हो ना हो..! निवृत्ती दिवशी न्‍या. एम. आर. शहा झाले भावुक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news