Ajay Devgn : अजय देवगणचा 'सिंघम' पुन्हा होणार प्रदर्शित

अजय देवगणचा 'सिंघम' पुन्हा होणार प्रदर्शित
Ajay Devgn
अजय देवगणचा 'सिंघम' पुन्हा होणार प्रदर्शित pudhari photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'सिंघम अगेन' आणि 'भूलभूलैय्या-३' हे बहुचर्चित चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहेत. दोन्ही सिनेमांतील कोणता सिनेमा बाजी मारेल हे प्रेक्षकांना त्यावेळी कळेल, या दोन्ही सिनेमांचे ट्रेलर प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस पडले आहे. सर्वाधिक चर्चा आहे 'सिंघम अगेन' या सिनेमाची.

या सिनेमात अनेक दिग्गज कलाकार कॅमिओ (पाहुणा कलाकार) करताना दिसणार आहेत. रोहित शेट्टी या सिनेमाचा पहिला भाग म्हणजे, 'सिंघम' सिनेमा पुन्हा प्रदर्शित होणार आहे. 'सिंघम अगेन' च्या पार्श्वभूमीवर 'सिंघम' हा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर १८ ऑक्टोबरला पुन्हा प्रदर्शित होणार आहे. 'सिंघम' या सिनेमात अजय देवगण, काजल अग्रवाल, प्रकाश राज, अशोक समर्थ हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकले होते.

'सिमम अगेन च्यापूर्वी 'सिंघम' या पहिल्या सिनेमाला प्रक्षेकांचा कसा प्रतिसाद मिळेल, याची उत्सुकता आता चाहत्यांमध्ये आहे. अजय देवगणच्या 'सिंघम' या सिनेमाचा पहिला आणि दुसरा भाग प्रेक्षकांना खूप पसंतीस उतरला होता. आता या सिनेमाचा तिसरा भाग म्हणजेच 'सिंघम अगेन' या सिनेमाची खूपच चर्चा रंगली आहे.

Ajay Devgn
Ajay Devgn-Tabu : अजय देवगन-तबू पुन्हा एकत्र, ‘औरों में कहा दम था’ यादिवशी येणार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news