

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचा एक छोटासा अपघात झाला आहे. ही अपघाताची घटना बुधवारी (दि.२६) रोजी संध्याकाळी मुंबईत घडली. एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ऐश्वर्याच्या कारला मागून एका लाल बसने धडक दिली. ऐश्वर्याला दुखापत झालेली नाही. ती पूर्णपणे ठीक आहे. अभिनेत्रीच्या जवळच्या सूत्रांनीही हीच माहिती दिली आहे. तसेच, ऐश्वर्या ठीक आहे आणि कोणताही मोठा अपघात झालेला नाही, असे सांगण्यात आले आहे.
ऐश्वर्याच्या कार आणि बसमध्ये झालेल्या धडकेचा व्हिडिओ पापाराझीच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आला होता, त्यानंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. ऐश्वर्या ठीक आहे की नाही याची त्याला काळजी वाटू लागली. व्हिडिओ क्लिपमध्ये असे दिसून येते की, बसने ऐश्वर्याच्या कारला मागून धडक दिली. त्यांच्या सुरक्षा पथकाने ताबडतोब गाडीतून उतरून परिस्थिती पाहिली.
ऐश्वर्या बहुतेकवेळा कार्यक्रम आणि फॅशन शोमध्ये दिसते. ऐश्वर्या सोशल मीडियावरही खूपच कमी सक्रिय आहे. ती फक्त वाढदिवस आणि वर्धापनदिनाच्या पोस्ट शेअर करते. याशिवाय, ती पॅरिस फॅशन वीकशी संबंधित काही पोस्ट शेअर करते. ऐश्वर्याप्रमाणेच मुलगी आराध्या बच्चनही चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे.