ऐश्वर्या राय-बच्चन हिने नुकताच आपला ५१ वा वाढदिवस साजरा केला, पण तिच्या वाढदिवसाला बच्चन कुटुंबातील कुणीही सोशल मीडियावर तिला शुभेच्छा दिल्या नसल्याचे बघायला मिळाले. यामुळे पुन्हा ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चावर शिक्कामोर्तब झाले आहे, पण यामुळे चाहते मात्र नाराज झाले आहेत. यावरून अनेकांनी अभिषेकची खरडपट्टी काढली आहे. किमान अभिषेककडून तरी चाहत्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती की, 'तो तरी पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देईल', पण तसे काहीच घडले नाही.
अभिषेकने त्याच्या नवीन चित्रपटाचे पोस्टर चाहत्यांसोबत शेअर केले. हे पाहून चाहत्यांनी संताप व्यक्त केला. 'कसला माणूस आहेस, तुझ्या पत्नीला किमान वाढदिवसाच्या शुभेच्छा तरी दे', अशी एकाने तर 'मला विश्वास नाही बसत की तिने तुझ्याशी लग्न केले आहे', अशी दुसऱ्याने, 'या माणसाकडून खूप नकारात्मक ऊर्जा जाणवते', अशी तिसऱ्या एकाने तर अभिषेक हा 'अयशस्वी नवरा असल्याचे म्हणत तू ऐश्वर्याचा नवरा होण्यास पात्र नव्हतास', अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या असून ऐश्वर्यासाठी हळहळ व्यक्त केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ऐश्वर्या लेक आराध्यासोबत रहात आहेत. यासाठी सर्वजण अभिनेत्री निम्रत कौर हिला जबाबदार धरत आहेत. निम्रतचे अभिषेकशी अफेअर असल्याची चर्चा रंगली आहे.