

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘रब से है दुआ’, ‘ये जादू है जिन का’ आणि ‘अपोलेना’ यांसारख्या टीव्ही शोमधून प्रकाश झोतात आलेल्या अभिनेत्री अदिती शर्माही घटस्फोट घेत असल्याचे वृत्त समोर आले आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये अदिती आणि अभिनीत कौशिकने गुप्तपणे लग्न उरकलं होतं. लग्नाच्या अवघ्या ४ महिन्यांनी दोघजण विभक्त होत आहेत. याच दरम्यान तिच्या पती अभिनीत एक नव्याने खुलासा केला आहे.
अभिनीत कौशिकने इंडिया फोरमशी बोलताना सांगितलं आहे की, 'आम्ही रिलेशनशिपमध्ये आणि लिव्ह-इनमध्ये राहत होतो. तिच्या जवळच्या सहकलाकारांना आमच्याबद्दल माहीत होतं. यानंतर ती गेल्या दीड वर्षांपासून माझ्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती आणि मी तिला लग्नासाठी तयार नसल्याचे सांगत तिला टाळत होतो. रिलेशनशिपच्या सुरुवातीला मी लग्नासाठी खूप उत्साही होतो, पण नंतर काही गोष्टींमुळे मी संभ्रमात होतो आणि लग्नासाठी तयार नव्हतो. तिने दबाव टाकल्याने नोव्हेंबर २०२४ मध्ये आमचे लग्न पार पडले.'
'सुरूवातीला मी तिचा मॅनेजर असल्याचे नाटक करत होतो आमि नंतर तिचं सोशल मीडिया, मीटिंग्ज सगळ सांभाळत होतो. लग्नाबद्दल कोणालाही काहीही सांगायचे नाही म्हणून तिने ठरवले होते. यामुळे पारसी कोठेही या गोष्टी बोलल्या गेल्या नाहीत. मात्र, सोशल मीडियावर आमच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले होते. लग्नात दोघांचेही कुटुंबीय उपस्थित होते, लग्न पूर्णपणे विधीनुसार पार पडले होते.' असेही त्याने सांगितले आहे.
याच दरम्यान अभिनीतने आदितीवर विवाहबाह्य संबंधांचे आरोपही केले आहेत. अदितीचे ‘अपोलेना’ मालिकेतील तिचा सह-कलाकार सामर्थ्य गुप्तासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचा दावाही केला आहे. याशिवाय अदितीने २५ लाख रुपयांची मागणी केल्याचेही सांगितले आहे. परंतु, अदितीने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.