

अदा शर्मा हिला 'द केरळ स्टोरी' सिनेमामुळे खूपच लोकप्रियता मिळाली. तत्पूर्वी तिने '१९२०' या हॉरर सिनेमातही अभिनय केला होता. त्याशिवाय अदा 'हँसी तो फँसी' या सिनेमातही झळकली होती. अदा नेहमीच चर्चेचा विषय ठरते असते. काही दिवसांपूर्वीच अदा ही दिवंगत अभिनेता सुशांतसिंह रजपूतच्या घरात शिफ्ट झाल्याची माहिती समोर आली होती. याच घरात सुशांतने जीवन संपवले होते. आता त्याच घरात अदा सध्या भाड्याने राहत आहे. या घरात शिफ्ट होण्यासाठी अदाला चकरा माराव्या लागल्या, अशी चर्चा आता रंगली.
एका मुलाखतीत अदाला विचारण्यात आले की, वैयक्तिक आयुष्यात कधी कोर्टात जावे लागले आहे का? यावर अदा म्हणाली की, कोणताही प्रोजेक्ट साईन करण्यापूर्वी करावा लागणारा करार पहिल्यांदा वकील वाचतात. त्यामुळे वकिलांशी तर माझा रोज फोन होत होता. तसेच घरात शिफ्ट झाल्यानंतर त्याच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मला कोर्टात जावे लागले होते. ते काम घरबसल्या ऑनलाईनही होऊ शकत होते; मात्र माझ्या ब्रोकरच्या सांगण्यावरून मी कोर्टात जाऊन कागदपत्रांवर सही केली; पण सुशांतच्या घरात शिफ्ट झाल्यानंतर तिच्यावर काहींनी टीकाही केली होती. आपण सुशांतच्या घरात खूप खूश असल्याचे तिने सर्वांना उत्तर दिले. हॉटस्टारवर 'रीता सान्याल' ही वेबसीरिज प्रदर्शित झाली. सध्या ती बॉलीवूडमध्ये मिळालेल्या यशाची चव चाखत आहे.