‘अग्गबाई सूनबाई’मध्ये आता ‘ही’ असेल शुभ्रा!

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

लोकप्रिय मालिका अग्गंबाई सासूबाई प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेऐवजी 'अग्गबाई सूनबाई' मालका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये आसावरी (निवेदिता सराफ) आणि अभिजीत राजे (गिरीश ओक) यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. मात्र सोहमची पत्नी शुभ्राची भूमिका तेजश्री प्रधान साकारणार नसून स्वामिनी मालिकेतील एक अभिनेत्री साकारणार आहे. 

अभिनेत्री उमा हृषिकेश असं त्या अभिनेत्रीचं नाव आहे. स्वामिनी मालिकेतील पार्वतीबाईची तिची भूमिका चांगली गाजली होती. आता ती 'अग्गबाई सूनबाई ' मालिकेमध्ये शुभ्राचे पात्र साकारणार आहे. 

'अग्गबाई सूनबाई'मध्ये आसावरी एका मोठ्या कंपनीची मालकीण असेल. या कंपनीचा कारभार आसावरी सांभाळतात. बबड्या अर्थात सोहमच्या मदतीने आसावरी सोहमची पत्नी शुभ्रा एका बाळाची आई झालेली दिसेल. 

'अग्गबाई सूनबाई'च्या रिलीज झालेल्या ट्रेलरमध्ये अभिजीत राजे घरी स्वयंपाक करताना दिसतात. आसावरी कंपनीत एका मीटिंगमध्ये बिझी असते. पण, आधीची आसावरी, तिचा लूक, तिचा स्वभाव हे सर्व बदलेलं दिसत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news