तीन भावंडांमध्ये सोहा अली खान आहे सर्वात लहान

Published on

मुंबई  : पुढारी ऑनलाईन  

'रंग दे बसंती', 'साहेब बीवी और गँगस्टर रिटर्न्स', 'दिल मांगे मोर' यांसारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांसमोर आलेली बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खानचा आज ४ ऑक्टोबर रोजी ४१ वा वाढदिवस आहे. १९७८ चा तिचा जन्‍म. सोहा प्रसिध्द क्रिकेटर दिवंगत मन्सूर अली खान पतौडी आणि अभिनेत्री शर्मिला टागोर यांची मुलगी आहे. सिनेइंडस्‍ट्रीमध्‍ये तिच्‍या आईसारखं (अभिनेत्री शर्मिला टागोर) सोहाचं करिअर घडलं नाही. परंतु, मोजक्‍याच चित्रपटातून तिने आपल्‍या अभिनयाची जादू दाखवली. 

खरंतरं, २००४ मध्ये बंगाली चित्रपट 'इति श्रीकांता'साठी सोहा अली खानने चित्रपटाचे शूटिंग सुरू केले होते. पुढे तिने शाहिद कपूरसोबत 'दिल मांगे मोर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. 'रंग दे बसंती' या चित्रपटातून सोहाला खास ओळख मिळाली. २००६ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटासाठी तिला 'आयफा'चा बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेसचा पुरस्कार मिळाला होता. 

तीन भाऊ-बहिणींमध्ये सोहा सर्वात लहान आहे. सोहाची मोठी बहिण सबा अली खान ज्वेलरी डिझायनर आहे. 

सोहाचं शिक्षण 

सोहा अली खानने ऑक्सफोर्डमधून मॉडर्न हिस्ट्रीचं शिक्षण घेतलं आहे. त्‍याशिवाय, तिने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्‍समधून 'इंटरनॅशनल रिलेशन'मध्‍ये मास्टर डिग्री पूर्ण केली आहे. सोहा 'The Perils of Being Moderately Famous' नावाने एक पुस्‍तक लिहिलं आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर सोहाने बँकमध्ये काम करण्यास सुरूवात केली. त्यांनी फोर्ड फाउंडेशन आणि सिटी बँकमध्ये काम केलं आहे. 

सोहाचे बालपण पटौदी पॅलेसमध्ये गेले. पुढे तिचे कुटुंबिय दिल्लीहून मुंबईत शिफ्ट झाले. 

सोहा २५ जानेवारी २०१५ रोजी अभिनेता कुणाल खेमूसोबत विवाहबद्ध झाली होती. त्‍यांना एक मुलगी असून इनाया असं तिचं नाव आहे. 

सोहा-कुणालची लव्‍ह स्‍टोरी

सोहा आणि कुणालची भेट 'ढूंढते रह जाओगे' चित्रपटाच्‍या शूटिंगवेळी झाली. पहिल्‍यांदा कुणाल तिला बरा वाटला नाही. त्‍याने सोहाला Hi देखील म्‍हटलं नाही. तर कुणालला वाटत होतं की, सोहा ऑक्सफर्ड युनिव्‍हर्सिटीत शिकली आहे. त्‍यामुळे कुणाल सोहाशी व्‍यवस्‍थित बोलत नव्‍हता.  

सोहा – कुणाल 'आहिस्ता आहिस्ता' चित्रपटावेळी एकमेकांना डेट करू लागले. कुणालने पॅरिसमध्ये सोहाला प्रपोज केलं होतं. ऑनस्क्रीन आल्‍यानंतर सोहा आणि कुणाल चांगले मित्र बनले. 

लग्नाआधी दोघांनी एकत्र राहण्‍याचा निर्णय घेतला. दोघेही लिव्‍ह इन रिलेशनशीपमध्‍ये राहिल्‍यानंतर दोघांचा विश्‍वास दृढ झाला. परंतु, एकमेकांवर लग्‍नासाठी कधी दबाव आणला नाही. एका महिन्‍यात सोहाने आपल्‍या आई-वडिलांशी कुणालला भेटवण्‍याचा निर्णय घेतला. आणि शर्मिला भेटण्‍यासाठी शूटिंगच्‍या सेटवर पोहोचल्‍या. नवाब साहेबना कुणाल आवडला तसेच सैफ अली खानला देखील कुणालचा स्‍वभाव आवडला. 'गो गोवा गॉन'च्‍या शूटिंगदरम्‍यान दोघांनी बराच वेळ स्‍पेन्‍ड केला. सैफने देखील कुणालला लग्नासाठी होकार दिला. सोहाच्या लग्नावेळी शर्मिला टॅगोर यांनी आपल्या मुलीला मुंबईतील खार येथे लिंकिंग रोडवरील एक अपार्टमेंट गिफ्ट केलं. सोहा आणि कुणाल पॅरिसमध्‍ये टाईम स्‍पेन्‍ड करत होते, त्‍यावेळी कुणालने सोहाच्‍या फेव्हरेट रिंगसोबत त्‍याने लग्‍नासाठी प्रपोज केलं. त्‍याची घोषणा त्‍याने ट्विटरवरून देखील केलं होतं. 

जानेवारी २०१५ मध्ये दोघांनी लग्न केले. मुंबईच्या खार स्थित मेहर अपार्टमेंटमध्ये दोघांनी साध्या पध्दतीने लग्न केले. हा खासगी समारंभ होता. यात केवळ सोहा आणि कुणालचे कुटुंबीय आणि निवडक मित्रमंडळी यावेळी उपस्‍थित होते. यादरम्यान, सोहाची आई शर्मिला टागोर, भाऊ सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी उपस्‍थिती लावली. रिसेप्शन मोठ्‍या धुमधडाक्‍यात आयोजित केले होते. यावेळी अनेक सेलेब्स स्पॉट झाले होते. 

पटौदी फॅमिलीतला प्रत्‍येक सदस्‍य स्‍टार आहे. आजोबा इफ्तिखार अली खान पटौदी आणि वडील मंसूर अली खान पटौदी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार होते. आई शर्मिला टॅगोर प्रसिध्‍द अभिनेत्री आहेत. भाऊ सैफ अली खान आणि वहिनी करीना कपूर खानदेखील स्‍टार्स आहेत. 

इतर चित्रपट 

सोहाने 'घायल वन्‍स अगेन' आणि '३१ ऑक्‍टोबर' यासारखे चित्रपट केले आहेत. 'प्यार में ट्विस्ट', 'रंग दे बसंती', 'आहिस्ता-आहिस्ता', 'खोया खोया चांद', 'साहेब बीवी और गँगस्टर रिटर्न्स' यांसारख्‍या चित्रपटांत काम केलं आहे. 

सोहाचे छंद 

सोहाला पेट्स आवडतात. त्‍याशिवाय, तिला पुस्‍तके वाचायला आवडतात. लिहायलाही आवडतं. सोहाच्या घरी एक लायब्ररी आहे. फावल्या वेळेत ती पुस्तके वाचत असते. याशिवाय, सोहाला टेनिस खेळायलाही आवडते. ती आपल्‍या फिटनेसवर लक्ष देते.

प्रेग्नेंसीवेळीही तिने आपल्या आरोग्याकडे चांगलं लक्ष दिलं होतं. हेल्‍दी प्रेग्‍नेंसीसाठी सोहा अली खानने अनेक गोष्‍टी केल्‍या होत्या. प्रेग्नेंसी दरम्‍यान कधीही केमिकलयुक्‍त प्रोडक्ट्सचा वापर तिने केला नव्हता, असे सोहाने एका मुलाखतीत सांगितले होते. 

सोहा म्‍हणाली होती, 'मी आई झाल्‍यानंतर केमिकलचा अजिबात वापर केला नाही. त्‍याऐवजी शंभर टक्‍के नैसर्गिक उत्‍पादने, औषधांचा वापर केला. जे पदार्थ तु्‍ही खाता त्‍याचा इफेक्‍ट तुमच्‍या त्‍वचेवर दिसतो. प्रेग्‍नेंट असताना कुठल्‍याही रासायनिक पदार्थांचा वापर केला नाही.' 

हेदेखील वाचा-

– सोहाला चॉकलेट, तंदूरी चिकन, ग्रील्ड चिकन आवडते. 

– मोठी बहिण सबा ज्वेलरी डिझायनर असूनदेखील सोहाला दागिने घालायला आवडत नाही.

– सोहाची केरळ, लंडन, मॉरीशस ही आवडती ठिकाणे आहेत. 

– ती लोकप्रिय मॉडल, नफीसा जोसेफची चुलत बहिण आहे. नफीसाने २००४ मध्ये आत्महत्या केली होती. 

– राकेश ओम प्रकाश मेहरा यांचा 'रंग दे बसंती' चित्रपटाच्या यशानंतर तमिळ अभिनेता सिद्धार्थ आणि सोहाच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु, एका मुलाखतीत सोहाने तसे काही नसल्याचे म्हणत

– चर्चांना पूर्णविराम दिला होता. रंग दे बसंतीमध्ये सिद्धार्थ, सोहा यांच्याशिवाय सुपरस्टार आमिर खान, शरमन जोशी, आर माधवन यांच्याही भूमिका होत्या. 

all photo-sakpataudi insta वरून साभार 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news