मुंबई : पुढारी ऑनलाईन
छोट्या पडद्यावरील कॉमेडी शो 'मे आय कम इन मॅडम' आणि सलमान खानच्या रिॲलिटी शो 'बिग बॉस-१२' ची स्पर्धक म्हणून नेहा पेंडसेने अधिक लोकप्रियता मिळवली.
नेहा 'मे आ/ कम इन मॅडम' मध्ये संजना हितेशीच्या भूमिकेत होती.
नेहाने आपल्या करिअरची सुरूवात बालकलाकार म्हणून केली होती.
तिने हिंदी चित्रपटांबरोबरचं तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि मराठी चित्रपटांमध्ये नशीब आजमावलंय.
नेहा आपल्या खासगी आयुष्याबद्द्लही अनेकवेळा चर्चेत राहिली आहे.
नेहाने तिचा बॉयफ्रेंड शार्दुल सिंहशी गुपचूप साखरपुडा करून सर्वांना धक्का दिला होता.
त्याशिवाय, आपल्या लुक्सबद्दलही ती सर्वांचे लक्ष वेधून घेते.
आतादेखील नेहाच्या जबरदस्त लूकमधील फोटोंनी सर्वांची झोप उडवली आहे.
नेहाचे पंजाबी ड्रेस, साडी, कुर्ता-पायजमा अशा वेगवेगळ्या आऊटफिटमधील फोटोज तिच्या सोशल मीडिया वर पाहायला मिळत आहेत.
साडीतील तिच्या फोटोवरून तुम्ही नजर हटवू शकणार नाही.
त्याचबरोबर, इतर ड्रेसमध्येदेखील तिचं सौंदर्य आणखी खूलून आलं आहे.
फोटो- Neha Pendse- ( नेहा पेंडसे) Fans, Neha Pendse facebook, Fans Of Neha Pendse facebook , angel_nehhapendse_fan insta, neha pendse insta वरून साभार