मंदिराचा बाथरूममध्ये बिकनी घालून वर्कआऊट!, व्हिडिओ व्हायरल

Published on
Updated on

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलीवूड ॲक्ट्रेस मंदिरा बेदी सध्या कुठल्याही एव्हेंट, सीरिअल, चित्रपटात दिसत नाहीय. पण तरीही ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. अनेकदा ती आपल्या वर्कआऊटचे व्हिडिओ चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. हे व्हिडिओ पाहुन मंदिरा किती फिट आहे हे तुम्हाला समजू शकेल. सध्या मंदिराचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर  व्हायरल झाला आहे. 

बाथटबच्या समोर वर्कआउट…

गुरुवारी (दि. १८) सकाळी मंदिरा बेदीने इंस्टाग्रामवर एक व्हिडियो शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मंदिरा बिकिनीमध्ये दिसत आहे. त्याचबरोबर ती बाथटबच्या समोर वर्कआउट करताना आपल्याला पहायला मिळते. ही व्हिडिओ पोस्ट करत तिने तिचं मनोगतही व्यक्त केलंय. मंदिरा म्हणते की, बाथटब, बिकनी आणि बँगिंग वर्कआउट… किक्स, ग्लूट ब्रिज, ट्रायसेप्स घाम गाळून कॅलरी बर्न करण्याचा उत्तम प्रकार… यानंतर सर्वात खाली लिहिलंय की, मी पण आज बिकिनी परिधान करून वर्कआउट केला. 

चार तासात १.५ व्ह्यूज

मंदिरा सोशल मीडियावर सक्रीय असते. तिचे इन्स्टाग्रामवर १४ लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत. गुरुवारी (दि. १८) जेव्हा तिने बिकनी वर्कआउटचा व्हिडियो पोस्ट केला तेव्हा तो वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओला चार तासातच १.५ हून अधिक व्ह्यूज आणि १५ हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसं पाहिलं तर मंदिराचा हा काही पहिला व्हिडिओ नाहीय. जेव्हापण कधी तुम्ही तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या रील्स सेगमेंटमध्ये जाल तेव्हा तुम्हाला तिच्या वर्कआउटचे अनेक व्हिडिओ पहायला मिळतील.


मुलाला दत्तक घेतले…. 

४८ वर्षीय मंदिरा बेदीने १९९९ मध्ये राज कौशलशी विवाह केला. राज दिग्दर्शक आणि निर्माता आहे. २०११ मध्ये या मंदिरा-राज जोडप्याला मुलगा झाला. ज्याचे नाव वीर आहे. त्यानंतर २०२० हे जोडपे पुन्हा एकदा चर्चेत आले, जेव्हा मंदिराने एका मुलीला दत्तक घेतले. या मुलीचे नाव तारा बेदी आहे. मंदिराच्या माहितीनुसार तारा त्यांच्या कुटुंबाचा हिस्सा २८ जुलै २०२० ला बनली. 

 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news