

अभिनेत्री अमृता राव ही सध्या सिनेसृष्टीपासून दूर असली तरी नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये तिने केलेला काळ्या जादूचा धक्कादायक खुलासा चर्चेचा विषय ठरत आहे. बीयर बाईसेप्स फेम रणवीर इलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये अमृताने सांगितले की, ‘मी एका गुरुजींना भेटायला गेले होते. त्यांनी मला आशीर्वाद दिला. दोन दिवसांनी त्यांनी माझ्या आईशी बोलून सांगितलं की तुझ्या मुलीवर वशीकरण करण्यात आलं आहे. ही गोष्ट ऐकून मी सुन्न झाले.
अन्य कोणी असतं तर कदाचित मी विश्वास ठेवला नसता, पण हे गुरू फारच पारदर्शक आणि स्वार्थशून्य आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्याला महत्त्व दिलं. एक काळ असा होता की मी 3 मोठ्या बॅनरच्या फिल्म्स साईन केल्या होत्या. त्या सर्व फिल्म्स त्या वर्षी निघणार होत्या. मी साइनिंग अमाऊंटही घेतला होता, पण त्या तिन्ही फिल्म्स बंद पडल्या. एकाही फिल्मचं शूटिंग पुढेच गेलं नाही. ते खूप अजीब होतं. आजही आठवलं तरी कळत नाही काय झालं होतं. तिने हे देखील मान्य केलं की, बॉलीवूडमध्ये काळा जादू किंवा वशीकरणासारख्या गोष्टी खर्या असू शकतात आणि पूर्वी फक्त इतर अभिनेत्रींकडून अशा अफवा ऐकल्या होत्या. सध्या अमृता राव आणि तिचा पती आर. जे. अनमोल हे दोघं मिळून यूट्यूबवर एक पॉडकास्ट शो चालवतात. त्या शोमध्ये ते सेलिब्रिटी कपल्सचे मुलाखती घेतात.