Siddharth Jadhav Health: एवढी कसली घाई आहे तुम्हाला, जरा मलातरी विचारा; 'मृत्यूशी झूंज' देणाऱ्या सिद्धार्थ जाधवची ठणठणीत पोस्ट

Siddharth Jadhav Health
Siddharth Jadhav Healthpudhari
Published on
Updated on

Siddharth Jadhav Health: प्रसिद्ध मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव याची प्रकृती बिघडली असून तो मृत्यूशी झुंज देत आहे अशा काही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. त्यावर आता अभिनेता सिद्धार्थ जाधवने स्वतः खुलासा केला असून त्याने या सगळ्या अफवा असून ज्यांनी अफवा पसरवल्या त्यांनी माझे नाटक पाहायला असं आवाहन देखील केलं.

Siddharth Jadhav Health
Siddharth jadhav | सिद्धार्थ जाधवच्या आयुष्यातील 'ती' पहिली गोष्ट अन् नागराज मंजुळेंचा विश्वास; 'दगडू विचारे'च्या भूमिकेमागची इमोशनल गोष्ट समोर

सिद्धार्थ जाधव आपल्या पोस्टमध्ये लिहितो की, 'नमस्कार, मी ठणठणीत बरा आहे. व्यवस्थित अॅनिमलचे प्रयोग सुरू आहेत. धिंगाणाचं शूट सुरू आहे. ज्या लोकांनी मला काळजीने मेसेज कॉल केला त्यांचे मनापासून धन्यवाद.'

सिद्धार्थ आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहितो की, 'बातमीदारांनी जरा मला विचारा. एवढी कसली घाई झाली आहे तुम्हाला? ज्याने हेडलाईन केली आहेत त्याला तर नोबेल द्यायला पाहिजे.'

सिद्धार्थने या पोस्टमध्ये मनुष्य हा इतर प्राण्यांपेक्षा जास्त घातक प्राणी आहे असं म्हणत टोमणा देखील हाणला. तो पुढे म्हणतो की, त्यांचे जाऊ देत निदान माझ्या नाटकाचं तरी प्रमोशन करतो. न्यूजवाल्यांनो माझ्या नाटकाला या २६ ऑगस्ट ८ वाजता छत्रपती शिवाजी मंदिर दादर ला

Siddharth Jadhav Health
Siddharth jadhav | सिद्धार्थचा आतापर्यंत न पाहिलेला अवतार, 'पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटातील धडकी भरवणारा लूक

सिद्धार्थ जाधवने या आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे त्याच्या आरोग्याबाबत किती चुकीची माहिती सोशल मीडियावर पसरत आहे याबाबत माहिती दिली. तसेच त्याने हे वृत्त खोटं असून अफवांवर विश्वास ठेवू नका असे अप्रत्यक्षरित्या सांगितलं. सिद्धार्थने हे प्रकरण फार डोक्यावर न घेता त्यातूनच आपल्या आगामी नाटकाचे प्रमोशन देखील करून घेतलं. अंस असलं तरी सिद्धार्थ ज्या लोकांनी, चाहत्यांनी आपल्या प्रकृतीची आपुलकीने आणि काळजीने चौकशी केली त्यांचे आभार मानायला मात्र विसरला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news