तू मला मिळालीस धन्य झालो…; कुशालने पोस्ट करत रिलेशन केलं कंन्फर्म

Shivangi Joshi
Shivangi Joshi
Published on
Updated on

पुढारी ऑनालईन डेस्क : अभिनेत्री शिवांगी जोशी आणि अभिनेता कुशल टंडन 'बरसात-मौसम प्यार का' यामधील दरदार केमिस्ट्री आणि बाँडिंगने चाहत्यांची मने जिंकली. पहिल्यांदा या जोडीने स्क्रीन शेअर करून चाहत्यांनी भारावून सोडले. दरम्यान कुशल आणि शिवांगी दोघेजण एकमेंकांच्या प्रेमात पडले आहेत आणि एकमेंकांना डेट करत आहेत. नुकतेच दोघांनी थायलंडमध्ये सुट्यांचा आनंद लुटला आहे. याचदरम्यान शिवांगीच्या खास वाढदिवसांच्या निमित्ताने कुशलने खास पोस्ट शेअर कतर नात्याचा खुलासा केला आहे. यामुळे सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाची चर्चा रंगू लागली आहे.

अभिनेत्री शिवांगी जोशीबद्दल 'हे' माहित आहे काय? 

  • अभिनेत्री शिवांगी जोशीने कुशल टंडनससोबत 'बरसात-मौसम प्यार का' या मालिकेत काम केलं.
  • शिवांगीने २०१३ मध्ये 'खेलती है जिंदगी आंख मिचोली' या चित्रपटातून पदार्पण केले.
  • या चित्रपटात शिवांगीने 'तृषा' ची भूमिका साकारली आहे.
  • 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतील 'नायरा सिंघानिया'च्या भूमिकेतून शिवांगीला लोकप्रियता मिळाली.

शिवांगी जोशीसाठी खास पोस्ट

काल म्हणजे, १८ मे २०२४ रोजी अभिनेत्री शिवांगी जोशीच्या २६ व्या वाढदिवस साजरा करण्यात आला. या वाढदिवासाच्या निमित्ताने कुशलने सोशल मीडियावर तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. त्याने त्याच्या इन्स्टावर स्वतःचा आणि शिवांगीचा एक फोटो शेअर करत रिलेशनशीपचा खुलासा केला आहे. या फोटोत दोघेजण ब्लॅक रंगाच्या स्वेटशर्टमध्ये दिसत आहेत. या पोस्टमुळे लवकरच दोघेजण लग्न करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर पसरली आहे. परंतु, याबाबत अधिकृत्त कोणतीच माहिती समोर आलेली नाही.

कुशलने पोस्टमध्ये लिहिलंय की,

कुशलने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "@shivangijoshi18 या सुंदर मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आज मी तुझा आणि तू माझी आहेस. त्या व्यक्तीचा आनंद साजरा करत आहोत. तू खूप दयाळू आहेस, तू खूप काळजी घेणारी आहेस, तू खूप मजेदार आहेस, मुलीने असायला हवे ते सर्व तू आहेस आणि माझ्या आयुष्यात आल्याबद्दल मी तुझा ऋणी आहे. तू मला मिळालीस अन् माझे आयुष्य सुखी झाले. मी खूप धन्य आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा एकत्रित साजरा कतर आहोत, या सुंदर आठवणी."

डेटिंगच्या चर्चा

कुशल टंडन आणि शिवांगी जोशी हे सुट्यांचा आनंद घेण्यासाठी १३ मे रोजी थायलंडला गेल होते. तेथेच दोघांना रोमॉन्टिक होवून काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलं होतं. तेव्हापासून दोघांच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या आहेत. यानंतर शिवांगीने सोशल मीडियावर बातम्याचे खंडन करत यातील काही खरे नसल्याचे म्हटलं होतं.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news