अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाची चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू आहे. दोघे विभक्त झाल्याचे बोलले जात आहे. अभिषेकचे अभिनेत्री निम्रत कौरसोबत अफेअर असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये दुरावा निर्माण झाला असल्याच्या पोस्टही व्हायरल होत आहेत. याचवेळी अभिषेकचा एक व्हिडीओ चर्चेत आला. त्याला नुकतेच मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले. तो बाहेर जात असताना पापाराझी त्याचे फोटो व व्हिडीओ काढण्यासाठी पाठलाग करत होते. मात्र, पापाराझी बराच वेळ त्याचे चित्रण करत असल्याने अभिषेकने त्यांना थेट हात जोडले.
यावेळी अभिषेकसोवत त्याचा मित्र आणि निर्माता बंटी वालिया होता. व्हिडीओमध्ये निळ्या रंगाचा स्वेटशर्ट आणि बेज पँट घातलेला अभिषेक विमानतळाबाहेर पडताना दिसला. मित्र बंटी वालिया आणि त्याचा मुलगा त्याच्यासोबत फिरताना दिसत आहेत. पापाराझी अभिषेकचा मोटारीपर्यंत पाठलाग करत असल्याने तो वैतागला आणि हात जोडून अभिषेक म्हणाला की, बस भैया, अभी हो गया, थैंक्यू! यावेळी अभिषेक पापाराझीना पोज देण्यासाठी थांबला नाही.