

गेल्या अनेक महिन्यांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दोघे घटस्फोट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. पण, अभिषेक, ऐश्वर्या किंवा बच्चन कुटुंबातील कोणही यावर अद्याप भाष्य केलेले नाही. मात्र, नेहमीच ऐश्वर्या आणि अभिषेक एकाच सोहळ्याला वेगवेगळे जातात. अखेर या दोघांचा एक फोटो समोर आला आहे. आता प्रसिद्ध निमति शशी रंजन यांची पत्नी अनु रंजनने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये पोस्टमध्ये त्यांच्यासोबत ऐश्वर्या आणि अभिषेक दिसत आहेत. ऐश्वयनि घेतलेला एक सेल्फी अनुने शेअर केला आहे. यात ऐश्वर्या, तिची आई वृंदा राय, अभिषेक आणि अनु असे चार जण दिसत आहेत. सर्वजण हसून या फोटोत पोज देताना दिसत आहेत. खूप सारे प्रेम! असे कॅप्शन अनुने फोटो दिले आहे. अनुची पोस्ट पाहून चाहते खुश झाले आहेत. अनेकांनी अनुचे आभार मानले आहेत. गेले अनेक महिने ऐश्वर्या आणि अभिषेकच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा होत्या. यातच अनुने ही पोस्ट केल्याने या चाँना पूर्णविराम मिळाला असल्याचे बोलले जात आहे.