गुड्डू भैय्या 'बाबा' झाला | अली फझल आणि रिचाच्या घरी आला नवा पाहुणा

रिचा चड्डाने दिला गोंडस मुलीला जन्म
Ali Faizal And Richa Chadda Become Parents
अली फझल आणि रिचाच्या घरी आला नवा पाहुणाPudhari File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : रिचा चड्डा आणि अली फजल हे आई-बाबा बनले आहेत. रिचा चड्डा हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. तिने ही माहिती सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे. रिचा चढ्ढाला मंगळवारी (दि.16) पहिले अपत्य म्हणून एका सुंदर मुलीला जन्म दिला. रिचा आणि अलीने आनंद व्यक्त करत शेअर केले की त्यांचे संबंधित कुटुंब देखील खूप आनंदी आहेत.

Ali Faizal And Richa Chadda Become Parents
Richa Chadha : लग्नानंतर इतकी बदलली रिचा, पाहा तिचा किलर लूक...

रिचा चड्डा आणि अली फजल यांनी गुरुवारी (दि.18) त्यांच्या मुलीच्या जन्मानंतर दोन दिवसांनी चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली, त्यानंतर चाहत्यांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. या दोघांनी यावर्षी फेब्रुवारीमध्ये प्रेग्नेंसीची घोषणा केली होती.

Ali Faizal And Richa Chadda Become Parents
स्वरा भास्करपासून रिचा चढ्ढापर्यंत, बॉलीवूडच्या ‘या’ दबंग अभिनेत्री, ज्यांना सोशल मीडियावर घाबरतात ट्रोलर्स

चाहत्यांचे आभार मानले

आनंदाची बातमी शेअर करताना रिचा म्हणाली, 'आम्हाला हे सांगताना खूप आनंद होत आहे की, आमची मुलगी 16 जुलै दिवशी या जगात आली आहे. ती पूर्णपणे निरोगी आहे. आमचे संपूर्ण कुटुंब खूप आनंदी आहे. आम्हाला इतके प्रेम आणि आशिर्वाद दिल्याबद्दल आम्ही आमच्या सर्वांचे आभारी आहोत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news