

बॉलीवूडची गॉर्जियस अभिनेत्री सोनम कपूर हिने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की ती एक अल्टिमेट फॅशनिस्टा आहे. सोनम कपूरच्या लेटेस्ट मॅटरनिटी फोटोशूटने सोशल मीडियावर चाहत्यांना आकर्षित केले आहे.
४० वर्षांची सोनम कपूर दुसऱ्यांदा आई होणार आहे. ती आपल्या प्रेग्नन्सीचा हा खास काळ मनापासून एन्जॉय करताना दिसत आहे. सोनमच्या चेहऱ्यावरचा प्रेग्नन्सी ग्लो अगदी स्पष्टपणे दिसून येतोय.
सोनमने नुकताच एक मॅटरनिटी फोटोशूट केला असून, त्यामध्ये ती ऑल ब्लॅक आउटफिटमध्ये एखाद्या डीवापेक्षा कमी दिसत नाही. तिने ब्लॅक क्रॉप टॉप आणि लाँग स्कर्ट असा लूक कॅरी केला आहे.
ब्लॅक आउटफिटसोबत तिने ब्लॅक बॅगही स्टाइल केली आहे. मिडल पार्टेड ओपन हेअर आणि न्यूड, ग्लोइंग मेकअपमध्ये सोनम अतिशय स्टनिंग दिसत आहे. तिचा हा अंदाज पाहून चाहते अक्षरशः थक्क झाले आहेत.
क्रॉप टॉपमध्ये बेबी बंप फ्लॉन्ट करत सोनमने अनेक किलर पोज दिले आहेत. तिच्या अल्ट्रा ग्लॅम लूकमुळे चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. प्रत्येक पोजमध्ये ती अत्यंत गॉर्जियस दिसत आहे.
प्रेग्नन्सीमध्येही सोनमचा स्टाइल स्टेटमेंट, तिची ग्रेस आणि एकूणच अंदाज सगळंच ऑन पॉइंट आहे. तिने या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे – “मामा डे आउट”.
सोनम कपूरबद्दल सांगायचं झालं तर, तिने २०१८ साली आनंद आहूजा यांच्यासोबत विवाह केला होता. लग्नानंतर २०२२ मध्ये या जोडप्याने मुलगा वायूचं स्वागत केलं. आता सोनम ४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार आहे.
सोनम आणि आनंद दोघेही आपल्या येणाऱ्या लहानशा पाहुण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. त्यांचा आनंद गगनात मावत नाही. चाहत्यांनाही सोनमच्या बाळाची आतुरतेने प्रतीक्षा आहे.