Akshay Kumar : ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ ट्रेलर उद्या; अक्षय-टायगर होळीचं सेलिब्रेशन पाहाच (video) | पुढारी

Akshay Kumar : 'बडे मियाँ छोटे मियाँ' ट्रेलर उद्या; अक्षय-टायगर होळीचं सेलिब्रेशन पाहाच (video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार ( Akshay Kumar ) आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांचा आगामी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा चित्रपट काही दिवसांपासून चर्चेत आहे. दोन्ही स्टार्स एकत्रित दिसणार असल्याने चाहत्यांची उत्कंठा वाढली आहे. दरम्यान आता प्रतिक्षा संपली असून ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर उद्या म्हणजे, २६ मार्च २०२४ रोजी चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. दरम्यान अक्षय आणि टायगरचा होळीचा गमंतीशीर व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या

अभिनेता अक्षय कुमार ( Akshay Kumar ) आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या इन्टांग्रामवर नुकताच दोघांच्या होळी खेळतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत टायगर अक्षयला होळीच्या रंगात भिजवण्यासाठी एका बादलीतून लाल रंगाचे पाणी घेवून त्याच्या घराच्या गेट जवळ उभारलेला असतो. दरम्यान खिलाडी अक्षय कुमार त्याच्या बंगल्यातून बाहेर येतो.

यावेळी गेटवर उभारलेला टायगर त्याच्या अंगावर पाणी मारणार इतक्यात अक्षय हातात असणारे नारळ मारेन असे म्हणतो. यानंतर टायगर त्याच्यावर पाणी ओतण्या ऐवजी स्वत: च्याच अंगावर बादलीतील पाणी ओतून घेतो. यावेळी टायगरला अक्षयच्या हातात रंगाचा फुगा असल्याचे वाटते. परंतु, तो फुगा नसून नारळ असतो. हा गंमतीशीर व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा नारळ अक्षयने पाठीमागून हातातून झाकून आणल्याचेही दिसतेय.

याचदरम्यान अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा आगामी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटातून चर्चेत आहे. हा चित्रपट १० एप्रिल २०२४ रोजी चाहत्याच्या भेटीस येणार आहे. तर सध्या या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर उद्या म्हणजे, २६ मार्चला रिलीज होणार आहे. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटातील एक पोस्टर सोशल मीडियावर शेअर करून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

अक्षय-टायगरसोबत या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर, अलाया एफ आणि रोनित बोस रॉयदेखील दिसणार आहेत. हा चित्रपट अली अब्बास जफर लिखित आणि दिग्दर्शित केला आहे. तर चित्रपटाची निर्मिती जफर, जॅकी भगनानी, वाशू भगनानी, दीपशिखा देशमुख आणि हिमांशू किशन मेहरा यांनी केली आहे.

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

Back to top button