Oscar 2024 : कलादिग्दर्शक नितीन देसाई यांना ऑस्करमध्ये वाहिली श्रद्धांजली

Oscar 2024
Oscar 2024
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई आणि दक्षिण कोरियाचा अभिनेता ली सन क्यून यांना यंदाच्या 'ऑस्कर २०२४' ( Oscar 2024 ) मध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. नितीन देसाई यांची गेल्या वर्षी स्वत : चे जीवन संपवले होते. तर अभिनेता ली सन क्यून याचीही मृत्यू झाला होता. ली सन क्यून याच्या शरीरात कार्बन मोनोऑक्साइडचे विषारी रसायन आढळून आले होते. यानंतर आता 'ऑस्कर' मध्ये दोघांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ऑस्कर सोहळ्यातील गा घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

संबंधित बातम्या 

नुकतेचा एक्स (X) ट्विटर 'ऑस्कर २०२४' ( Oscar 2024 ) च्या सोहळ्यातील एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत नितीन देसाई यांचे पूर्ण नाव नितीन चंद्रकांत देसाई असे म्हणत भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली आहे. तसेच त्यांच्या चित्रपटातील काही क्लिपही दाखवण्यात आल्या आहेत. नितीन देसाई, ली सन क्यून याच्यासोबत या सोहळ्यात मॅथ्यू पेरी, हॅरी बेलाफोंटे, पी-वी हर्मन, अभिनेता पॉल रुबेन्स, मेलिंडा डिलन, नॉर्मन ज्यूसन, पाइपर लॉरी, रायन ओ नील, ज्युलियन सँड्स, कार्ल वेदर, ट्रीट विल्यम्स आणि बर्ट यंग यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली.

दरम्यान एंड्रिया बोसेली आणि त्यांचा मुलगा मॅटेओ बोसेली यांनी इन मेमोरिअम सेगमेंटमध्ये धमाकेदार परफॉर्म सादर केला. दोघांचा डान्स पाहून उपस्थित असणारे सगळेच आश्चर्यचकित झाले. दरम्यान कार्यक्रमात संगीत आणि नृत्यासोबत सर्व स्टार्सचे काही प्रसिद्ध संवादही बॅकग्राउंडमध्ये वाजवण्यात आले आहेत.

नितीन देसाई यांचा मृत्यू

नितीन देसाई यांनी २ ऑगस्ट २०२३ रोजी गळफास घेवून स्वत: चे जीवन संपवले होते. नितीनने १९८९ मध्ये 'परिंदी' या चित्रपटातून पहिल्यांदा पदार्पण केले. '१०४२ : अ लव्ह स्टोरी', 'खामोशी द म्युझिकल', 'प्यार तो होना ही था', 'हम दिल छडे चुके सनम', 'देवदास', 'मुन्नाभाई एमबीबीएस', २०१९ मधील 'पानिपत' आणि २०२० 'पौराशपूर' यासारख्या चित्रपटात त्यांनी कला दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. तर ली सन क्यून यांचाही मृत्यू झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news