Siddhant Chaturvedi : स्क्रिप्ट तयार नसल्याने सिद्धांतने नाकारला ‘ब्रह्मास्त्र’ | पुढारी

Siddhant Chaturvedi : स्क्रिप्ट तयार नसल्याने सिद्धांतने नाकारला ‘ब्रह्मास्त्र’

पुढारी ऑनलाईन डेस्क : गल्ली बॉय सिनेमानंतर अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी ( Siddhant Chaturvedi ) , दीपिका पदुकोण, अनन्या पांडे यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘गहराईयां’ सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसला. पण आलिया भट्ट, रणबीर कपूर हे प्रमुख भूमिकेत असलेला ‘ब्रह्मास्त्र : 1- शिवा’ हा सिनेमा नाकारल्याचा सिद्धांतला टीकेला सामोरे जावे लागले होते.

यावर सिद्धांत एका मुलाखतीत म्हणाला की, ‘गल्ली बॉय’ या सिनेमाच्या एक महिन्यापूर्वी ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमाची कास्टिंग सुरू झाली होती. या सिनेमाची मला ऑफर मिळाली होती. पण त्याची स्क्रिप्ट तयार नव्हती. त्यांनी मला सांगितले की, हा एक अ‍ॅक्शन फॅन्टसी सिनेमा आहे आणि यात तू मार्शल आर्टस् करशील.

आश्रमातील एका सुपर हिरोची भूमिका मला मिळाली होती. म्हणून ते मला म्हणाले की, तू हे करायला हवे. त्यानंतर मी सिनेमाच्या दिग्दर्शकाला भेटलो. मी अयान मुखर्जी यांना म्हणालो की, मला स्क्रिप्ट द्या म्हणजे या पात्राबाबत माहिती मिळेल; परंतु त्यांच्याकडे स्क्रिप्ट नव्हती आणि त्यावेळी त्या चित्रपटाची नुकतीच सुरुवात झाली होती. चित्रपटाचे तीन भाग होणार होते आणि काय निर्णय घ्यावा याबद्दल मी विचार करीत होतो. मी कास्टिंग दिग्दर्शकाला सांगितले की, मी हा चित्रपट करू शकणार नाही.

Back to top button