O Yeong-su : स्क्विड गेम फेम ओह येओंग-सूला लैंगिक अत्याचार प्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा | पुढारी

O Yeong-su : स्क्विड गेम फेम ओह येओंग-सूला लैंगिक अत्याचार प्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘स्क्विड गेम’ या कोरियन वेबसिरीजमुळे प्रकाश झोतात आलेला अभिनेता ओह येओंग-सू ( O Yeong-su) याला लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणी १ वर्षाचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २ फेब्रुवारी रोजी एका महिलेने केलेल्या आरोपानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर या खटल्याचा निकाल लागला.

संबंधित बातम्या 

एका रिपोर्ट्सच्या माहितीनुसार. ७८ वर्षीय अभिनेता ओह येओंग-सू ( O Yeong-su) याच्यावर २०१७ मध्ये एका महिलेने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. यानंतर २०२१ मध्ये या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान सुवॉन (Suvon) शहरातील वकिलांनी ओह येओंग-सू यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप लावत गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची आता चौकशी होवून १ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

एका महिलेच्या तक्रारीवरून डिसेंबर २०२१ मध्ये ओह येओंग-सू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर अहवालांवर विश्वास ठेवून एप्रिलमध्ये केस बंद करण्यात आली होती, परंतु, पीडित महिलेच्या विनंतीने ही केस पुन्हा उघडण्यात आली.

सुनावणीदरम्यान ओह येओंग-सू यांच्यावरील सरकारी वकिलांनी चौकशी करून सर्व आरोप नाकारले होते. यानंतर त्यांनी एक निवेदन सादर करून माफीनामाही मागितला होता. या निवेदनात म्हटलं होत की, “मला तलावाभोवती मार्ग दाखवण्यासाठी मी तिचा हात धरला होता. परंतु, याचा अर्थ असा नाही की मी चुकीची काही करतोय.”

वर्कफंटबद्दल बोलायचे झाल्यास, ओह येओंग-सूचा ‘स्प्रिंग, समर, फॉल, विंटर… अँड स्प्रिंग’ या चित्रपटात काम केलं आहे. ‘स्क्विड गेम’ वेबसिरीजमधील ‘प्लेयर 00१’ खेळण्यासाठी अभिनेता ओह येओंग-सू प्रसिद्ध असलेला आहे. तर त्याला यातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Squid Game (@squidgamenetflix)

 

View this post on Instagram

 

A post shared by Oh-young_soo (@ohyoung_so)

Back to top button