Musafira Movie : मैत्रीची वीण घट्ट करणाऱ्या ‘मुसाफिरा’ चं पोस्टर रिलीज; ‘या’ दिवशी येणार भेटीला | पुढारी

Musafira Movie : मैत्रीची वीण घट्ट करणाऱ्या 'मुसाफिरा' चं पोस्टर रिलीज; 'या' दिवशी येणार भेटीला

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मैत्री महत्वाची असते, हे अधोरेखित करणारा ‘मुसाफिरा’ ( Musafira Movie ) चित्रपट येत्या २ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचे आणखी एक नवीन पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या पोस्टरमध्ये चार ‘मुसाफिरा’ एकत्रित दिसत असून या चौघांची ओळख या पोस्टरमधून होत आहे.

संबंधित बातम्या 

आनंद पंडित मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने, नितीन वैद्य प्रॉडक्शन आणि गुझबम्प्स एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘मुसाफिरा’ ( Musafira Movie ) या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर जोग यांनी केलं आहे. ‘मुसाफिरा’ चित्रपटाच्या घोषणेपासून याची सर्वत्र चर्चा होती. आता या नवीन पोस्टरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

‘मुसाफिरा’ मध्ये पुष्कर जोग हॅप्पी आणि हॅपेनिंग ‘निशांत’ ची भूमिका साकारणार असून पूजा सावंत सुपरस्टार ‘मेघा’ च्या भूमिकेत दिसणार आहे. स्वभावाने भोळा असणाऱ्या ‘अमेय’ च्या भूमिकेत पुष्कराज चिरपुटकर आहे. तर दिशा परदेशी ग्रुपला जोडून ठेवणारी प्रचंड एनर्जेटिक आणि तितकीच क्युट असलेली ‘मिथिला’ साकारणार आहे. तर ग्रुपमधील नाजूक प्रकरण आणि प्रचंड हळव्या ‘क्रेया’ च्या भूमिकेत स्मृती सिन्हा आहे. या चौघांच्या भन्नाट पोस्टरमधून त्यांचे बॉंडिंग दिसत आहे. आता ही मैत्री कोणत्या वळणावर जाणार?, यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा चित्रपट येत्या २ फ्रेबुवारीला प्रदर्शित होणार आहे.

Back to top button