IFFI 2023 Goa :’एन्डलेस बॉर्डर्स’ चित्रपटाला गोल्डन पीकॉक पुरस्कार; ऋषभ शेट्टीला ‘कांतारा’ साठी स्पेशल ज्युरी पुरस्कार | पुढारी

IFFI 2023 Goa :'एन्डलेस बॉर्डर्स' चित्रपटाला गोल्डन पीकॉक पुरस्कार; ऋषभ शेट्टीला 'कांतारा' साठी स्पेशल ज्युरी पुरस्कार

प्रभाकर धुरी

पणजी : एन्डलेस बॉर्डर्स या चित्रपटाला इफ्फीमध्ये दिला जाणारा प्रतिष्ठित गोल्डन पीकॉक पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारासाठी यावर्षी 15 चित्रपटांची निवड झाली होती. यात 12 आंतरराष्ट्रीय आणि 3 भारतीय चित्रपटांचा समावेश होता. IFFI 2023 Goa

अभिनेता ऋषभ शेट्टीला ‘ कांतारा’ साठी स्पेशल ज्युरी पुरस्कार मिळाला आहे. इफ्फीत यंदा सुरु करण्यात आलेल्या उत्कृष्ट वेबसिरीजचा पहिला पुरस्कार पंचायत सिझन २ ला जाहीर झाला. आयसीएफटी गांधी मेडल स्पर्धेत अँथनी चेन दिग्दर्शित ‘ड्रिफ्ट’ सिनेमाला पारितोषिक देण्यात आले. जगभरातील १० चित्रपट या स्पर्धेत होते. IFFI 2023 Goa

हेही वाचा 

Back to top button