Khurchi Movie : ‘कोण आला रे कोण आला, खुर्चीसाठी लढणारा वाघ आला’; राकेश बापटची एन्ट्री | पुढारी

Khurchi Movie : 'कोण आला रे कोण आला, खुर्चीसाठी लढणारा वाघ आला'; राकेश बापटची एन्ट्री

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता राकेश बापटचा दमदार अभिनयाने भरलेला ‘खुर्ची’ ( Khurchi Movie ) हा चित्रपट पुढच्या वर्षी चाहत्यांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात राकेश बापटची सत्तेची खुर्ची मिळवण्यासाठीची धडपड पाहायला मिळणार आहे. राकेशला ही खुर्ची कशी मिळेल?, तो जिंकणार का? यासाठी चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यामुळे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

संबंधित बातम्या 

‘खुर्ची’ ( Khurchi Movie ) या चित्रपटात दमदार भूमिकेत राकेश बापटला पाहणं रंजक ठरणार आहे. आत्मनिर्भर, स्वबळाने आणि मुख्यत्वे बुद्धीचा वापर करून स्वतःच विश्व निर्माण करणाऱ्या महत्वपूर्ण भूमिकेत राकेश पाहायला मिळतोय. आजवर राकेशने त्याच्या अभिनयमकौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकलीच आहेत. आता पुन्हा एकदा राकेशमधील करारीपणा ‘खुर्ची’ या चित्रपटातून चाहत्याना अनुभवायला मिळणार आहे. खुर्चीसाठीची लढाई राकेश लढणार का? आणि चित्रपटातील सत्तेसाठीच्या या लढाईत राकेशला खुर्ची मिळणार का? हे पाहणं रंजक ठरणार आहे. यामुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

संतोष कुसुम हगवणे प्रस्तुत ‘आराध्या मोशन फिल्म्स’, आणि ‘योग आशा फिल्म्स’ निर्मित केली आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा संतोष कुसुम हगवणे, योगिता गवळी आणि प्रदीप नत्थीसिंग नागर यांनी सांभाळली आहे. डॉ. अमित बैरागी आणि आतिश अंकुश जवळकर यांची सहनिर्मिती असून राजकारणाचे विविध रंग या चित्रपटात रेखाटण्यात आले आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद निर्माते संतोष कुसुम हगवणे यांची आहे. शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा उत्तमरीत्या पेलवली आहे.

तर क्रिएटिव्ह हेड म्हणून प्रतिक वसंतराव पाटील यांनी बाजू सांभाळली आहे. या चित्रपटात राकेश बापट, अक्षय वाघमारे, आर्यन हगवणे, सुरेश विश्वकर्मा, महेश घग, अभिनेत्री प्रीतम कागणे, कल्याणी नंदकिशोर, श्रेया पासलकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. याशिवाय अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी ही चित्रपटात दमदार भूमिका साकारली आहे. ‘खुर्ची’ हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट येत्या नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यात म्हणजे १२ जानेवारी २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Back to top button