पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बी फेम आणि उर्फी जावेद ( Urfi Javed ) तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेचा विषय बनते. कधीकधी तिच्या अंतरंगी फॅशनेने नेटकरी अक्षरश: वैतागून जातात. दरम्यान तिला काही नेटकरी ट्रोलही करतात. मात्र, उर्फीवर यांचा काहीही फरक पडत नाही. गेल्या काही दिवसापूर्वी उर्फीला मुंबई पोलिसांनी छोटे- छोटे कपडे घातले म्हणून अटक केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ शेअर होताच तिच्या चाहत्यांना धक्का बसला. तर काहींना हा फेक असल्याचे वाटत होते. आता उर्फीने एक व्हिडिओ शेअर करत याबाबतचा खुलासा केला आहे.
संबंधित बातम्या
उर्फीने ( Urfi Javed ) शेअर केलेल्या व्हिडिओत ती जेलमध्ये असून तिने तुरूगांतील राहणीमान दाखविले आहे. दरम्यान ती तुंरूगात बोल्ड फोटोशूट करताना खूपच सुंदर दिसत आहे. याशिवाय उर्फी तुंरूगात टेलिफोन लावताना, कपडे शिवताना आणि वेगवेगळ्या लूकमध्ये बोल्ड फोटोशूट करताना दिसत आहे. यावरून उर्फीने तिच्या नव्या फॅशन फोटोशूटसाठी हे सर्व काही केल्याचे समोर आले आहे.
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने ' मला अटक खऱ्या मुंबई पोलिसांनी नव्हे तर फॅशन पोलिंसानी केली होती. माझ्या फॅशन गेमसाठी मुंबई पोलिसांनी अटक केली. परंतु, ते मला रोखू शकलेले नाहीत!…काही सिझलिंग शैलींसाठी सज्ज व्हा!' असे तिने लिहिले आहे. या सगळ्यावरून उर्फीला काही दिवसापूर्वी फॅशन पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळत आहे. बोल्ड फोटोसाठी उर्फीने हा सेट उभारला असल्याचेही समजतेय. या व्हिडिओवर चाहत्यांसह अनेकांनी कॉमेन्टचा वर्षाव केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यत ८८ हजारांहून अदिक जणांनी लाईक्स केलं आहे.