Urfi Javed style : उफ्फ्‌ नवरात्रीत उर्फीची फॅशन अशक्य आणि अशक्यच…

Urfi Javed style
Urfi Javed style

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस फेम अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या स्टायलिश फॅशन सेन्समुळे (  Urfi Javed style ) नेहमीच चर्चेत असते. उर्फी आली आणि तिच्या लूकची चर्चा झाली नाही होतच नाही. उर्फी स्पॉट झाली की, तिच्या नवनविन स्टाईलची चर्चा होतेच. सध्या तिच्या आणखी एक ड्रेसनं चाहत्याचे लक्ष वेधून घेतलंय. मात्र, एकिकडे चाहते तिच्या सौंदर्याचे भऱभरून कौतुक करत आहेत तर दुसरीकडे तिला नेटकऱ्यांनी ट्रोलदेखील केलं आहे. या दरम्यानचा लूक मात्र, खास आहे.

संबंधित बातम्या 

अभिनेत्री उर्फी जावेद (  Urfi Javed style ) सकाळीच विमान तळावर स्पॉट झाली आणि नेहमीप्रमाणे तिच्यावर पॉपाराझीच्या कॅमेऱ्याची नजर पडली. यावेळी तिच्यासाठी चाहत्यांनी केक आणला होता. मात्र, यावेळी उर्फीने कलरफूल क्रॉप टॉपसोबत लॉन्ग स्कर्ट परिधान केला होता. या लूकमध्ये उर्फीने एका पेक्षा एक हॉट पोझ दिल्या आहेत. तर ती गडबडीत असून पळताना दिसत आहे.

परंतु, हा लूक तिचा नेहमीपेक्षा वेगळा आहे. कारण यावेळी उर्फीने अंगभर पायापर्यत कपडे परिधान केले आहेत. तरी देखील तिला नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. या फोटोला उर्फीने 'Happy Navratri' असे कॅप्शऩ लिहिली आहे. यावरून उर्फीला नवरात्रीची आठवण असल्याचे युजर्संनी म्हटलं आहे.

हा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी तिच्या लूकचे भऱभरून कौतुक केलं आहे. यात काही युजर्संनी म्हटलं की, 'तू छान दिसत आहेस', 'माय बेस्ट डिअर उर्फी' ' मराठी मुलगीचा हा लूक परफेक्ट आहे'. दरम्यान काही नेटकऱ्यांनी उर्फीला 'हे अशक्य आणि अशक्य आहे.' 'धन्यवाद तुम्हालाही नवरात्रीची माहिती आहे का?. असे ट्रोल करताना म्हटलं आहे. या व्हिडिओला पाच तासांत १० हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

(video : viralbhayani and photo : urf7i instagram वरून साभार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news