शमिता शेट्टी म्हणते, पुनरागमन नाहीच!

शमिता शेट्टी
शमिता शेट्टी

पुढारी ऑनलाईन : २००२ साली 'मोहब्बते' चित्रपटातून पदार्पण करणारी शमिता शेट्टी अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'द टेनंट' या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रकाश झोतात आली आहे. बरेच जण शमिताचे हे पुनरागमन आहे, असे म्हणत आहेत. स्वतः शमिता मात्र, याचा इन्कार करते.

'पुनरागमन करण्यासाठी मी यापासून फार दूर गेलेच नव्हते. मोजक्याच भूमिका कराव्यात, पण त्या अतिशय चोखंदळ असाव्यात. यावर माझा भर असतो. याच दृष्टिकोनातून मी याकडे पाहते. संख्येपेक्षा मी दर्जावर अधिक भर देते आणि याचमुळे माझे दोन चित्रपट प्रदर्शित होण्यात बरेच अंतर असते. आता मात्र, ओटीटी प्लॅटफॉर्मवर माझ्याकडे काही स्वारस्यपूर्ण प्रोजेक्ट आहेत', असे शमिता याप्रसंगी म्हणते.
माझ्यासाठी आतापर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता, असेही ती आवर्जून सांगते. 'प्रारंभी मला या सर्व बाबींशी जुळवून घेणे खूप कठीण गेले. पण, आता सर्व काही ठीक आहे. लोकांच्या अपेक्षा आणि त्यांचा आपल्याविषयी दृष्टिकोन यात बराच फरक असतो.

दुर्दैवाने सातत्याने तुलना देखील होत असते. बॉक्स ऑफिसवरील आकडे आणि चाहत्यांचा प्रतिसाद हे दोन्ही घटक कोणत्याही कलाकारासाठी महत्वाचे असतात. आता तरी कटेंट आता हाच किंग आहे'. असे तिने आपल्या २३ वर्षांच्या अनुभवावरून सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news