Kangana Ranaut : ‘ऑफ-शोल्डर’ ड्रेसमुळे कंगना लाईमलाईटमध्ये | पुढारी

Kangana Ranaut : 'ऑफ-शोल्डर' ड्रेसमुळे कंगना लाईमलाईटमध्ये

पुढारी ऑनलाईन : स्वतःला भांडवलशाही व्यवस्थेची बळी मानणारी कंगना राणावत ( Kangana Ranaut ) नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत राहत आली आहे. आपण एखाद्या पाश्चिमात्य महिलेप्रमाणे दिसावे, यासाठी आपला ब्रेनवॉश केला गेला होता, असे ती यापूर्वी म्हणाली होती. शनिवारी मात्र तिच्या एअरपोर्ट लूकने सारे फक्त घायाळ व्हायचे बाकी राहिले होते.

कंगनाने ( Kangana Ranaut ) ‘टिकू वेडस शेरु’ चित्रपटाच्या पार्टीप्रसंगी ऑफ शोल्डर ड्रेस परिधान करत अवघ्या चित्रपटसृष्टीचे लक्ष वेधून घेतले होते. या पार्टीतील काही छायाचित्रे तिने आता इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे.

कंगनाने त्या पार्टीत ऑफ शोल्डर केशरी ड्रेस परिधान केला आणि सोनेरी रंगाच्या हिल्सची त्याला जोड दिली. आश्चर्य म्हणजे महिनाभरापूर्वीच तिने अमेरिकन लूकवर जोरदार टीका केली होती. पण, आता तिनेच असा पेहराव परिधान करत नव्या चर्चेला सुरुवात केली आहे.

मागील महिन्यात इन्स्टाग्रामवरच तिने एअरपोर्ट ट्रेंड आपणच सुरु केला, असा दावा केला होता आणि पाश्चिमात्य महिलेप्रमाणे दिसत आंतरराष्ट्रीय डिझायनर्सचे खिसे भरावेत, यासाठी मॅगझिन्स व फॅशन इंडस्ट्रोकडून आपला ब्रेनवॉश केला जात आहे, असे ती म्हणाली होती.

Back to top button