

पुढारी ऑनलाईन : दिग्दर्शक ओम राऊतच्या बहुप्रतिक्षित 'आदिपुरुष' चित्रपटात प्रभास, क्रिती सेनान, सैफ अली खान, सनी सिंग, देवदत्त नागे अशी तगडी स्टारकास्ट आहे. मराठमोळ्या ओम राऊतने या बिग बजेट चित्रपटात एका मराठमोळ्या अभिनेत्रीला महत्त्वाची भूमिका दिली आहे. ( Tejaswini Pandit )
या चित्रपटात शुर्पणखाची भूमिका तेजस्विनी पंडित ( Tejaswini Pandit ) या मराठी अभिनेत्रीने साकारली आहे. खरे काही महिन्यांपूर्वी तिने 'आदिपुरुष' चित्रपटात झळकणार असल्याची माहिती दिली होती. पण, तिने तिच्या भूमिकेबद्दल काहीच खुलासा केला नव्हता. तसेच निर्मात्यांकडूनही तिच्या भूमिकेबद्दल माहिती दिली नव्हती. त्यामुळे तिला शुर्पणखाच्या भूमिकेत पाहणे हे 'आदिपुरुष' पाहण्यासाठी गेलेल्या मराठी प्रेक्षकांसाठी सरप्राईज होते. 'आदिपुरुष' चित्रपटात मराठी अभिनेता देवदत्त नागे याने हनुमानाची महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.