बॉक्स ऑफिसवर ‘फास्ट एक्स’ चे तुफान! | पुढारी

बॉक्स ऑफिसवर ‘फास्ट एक्स’ चे तुफान!

पुढारी ऑनलाईन : चित्रपट शौकिनांसाठी या आठवड्यात एकापेक्षा एक चित्रपट झळकले आहेत. यात हॉलीवूडच्या अ‍ॅक्शनपटासह बॉलीवूडच्या रोमँटिक, कॉमेडीपटांपर्यंत सर्व चित्रपटांचा समावेश आहे. 2023 मध्ये ‘पठाण’, ‘तू झुठी मै मक्कार’, ‘द केरला स्टोरी’ अशा चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धमाल केली.

या आठवड्यात मनोरंजनावर आधारित चित्रपटही प्रदर्शित झाले. यात मार्व्हल मुव्हीजच्या ‘स्पायडर मॅन- क्रॉस द स्पायडर वर्स’पासून सारा अली खानच्या ‘जरा हटके, जरा बचके’ चित्रपटाचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर, या सार्‍या चित्रपटांचे कलेक्शन कसे राहिले, हे रंजक आहे.

विकी कौशल व सारा अली खान यांचा ‘जरा हटके, जरा बचके’ हा चित्रपट दि. 2 जून रोजी रीलिज झाला असून 40 कोटी रुपयांचे बजेट असलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी 5.5 कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. ‘स्पायडर मॅन’ चित्रपटातील प्रत्येक सीरिज हिट ठरत आली असून या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या नव्या चित्रपटाचाही याला अपवाद नाही. ‘फास्ट एक्स’ चित्रपटाने 16 व्या दिवसापर्यंत 1 कोटी रुपयांपर्यंत कमाई नोंदवली आहे.

Back to top button