Kangana Ranaut : ‘एअरपोर्ट लूक’ला कंगनाचा अलविदा | पुढारी

Kangana Ranaut : ‘एअरपोर्ट लूक’ला कंगनाचा अलविदा

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री कंगना राणावतला चित्रपटाबरोबरच तिच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल देखील ओळखले जाते. जवळपास प्रत्येक मुद्द्यावर तिची स्वतंत्र मते असतात आणि ती जाहीरपणे व्यक्त करते. आता ‘एअरपोर्ट लूक’ ला अलविदा करत असल्याचे तिने म्हटले आहे. या ट्रेंडची सुरुवात आपणच केली, असा तिचा दावा आहे.

36 वर्षीय कंगनाने यावेळी सोशल मीडियावर काही छायाचित्रे पोस्ट केली असून याबद्दल ती म्हणते, ‘मॅगझिनचे अधिकारी व फॅशन इंडस्ट्रीमधून आपण वेस्टर्न महिलांप्रमाणे दिसावे, यासाठी सातत्याने दडपण टाकले जात होते. इंटरनॅशनल डिझायनर्सचे खिसे भरावेत, हा त्यामागील उद्देश होता.

माझ्या आवडीनिवडी काय आहेत, याचा विचार करण्याऐवजी कपडे घेणे मला पसंत असत नाही. मी एका बिंबोप्रमाणे काम करते. सिस्टीममध्ये माझी फॅशनिस्टा म्हणून ओळख आहे. आतापर्यंत मी सारे काही केले; पण एअरपोर्ट लूकबद्दल संकल्पना बदलण्याची गरज आहे. आता मी कपडे खरेदी करतानाही स्वत:ला विचारते, याचा भारतीयांना किती फायदा होऊ शकतो?’

हेही वाचा : 

Back to top button