

मॉडेल उर्फी जावेद नेहमीच तोकड्या कपड्यांमुळे चर्चेत असते. कपड्यांमुळे ती अनेकवेळा वादात अडकली आहे. आता उर्फी तिच्या फॅशनमुळे नाही तर, एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे. सध्या उर्फीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्यामुळे उर्फी चर्चेत आली आहे. व्हिडीओमध्ये उर्फीने दिग्दर्शक आणि निर्मात्यांवर निशाणा साधला आहे. सध्या सर्वत्र उर्फीच्या व्हिडीओची चर्चा रंगत आहे. व्हिडीओत उर्फीने स्वतःच्या फॅशनबद्दल देखील मोठा खुलासा केला. ती म्हणाली, मला माझ्या बॉडीला अशा प्रकारे प्रेझेंट करायला आवडते. माझी कला प्रेझेंट करायला आवडते. लोकांच्या भावना का दुखावत आहेत, हे मला कळत नाही. सिनेमात आयटम साँग्स असतात, तरीही कोणीही दिग्दर्शक, निर्मात्यांना टार्गेट करत नाही. मुलीकडून हे काय करून घेतले. हिने काय कपडे घातले आहेत, कशी डान्स करत आहे. ती तर केवळ दिग्दर्शक, निर्माते सांगतात तसे करते . कोणीच दिग्दर्शक, निर्मात्यांना बोलत नाही. कायम केवळ मुलींना गोष्टी ऐकाव्या लागतात.