ती चाहती म्हणाली, या जन्मात कॅटरिना, पुढील जन्मात मी ! | पुढारी

ती चाहती म्हणाली, या जन्मात कॅटरिना, पुढील जन्मात मी !

पुढारी ऑनलाईन : सध्या सर्वांच्या नजरा विकी कौशल व सारा अली खान यांच्यावर खिळलेल्या आहेत. ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट लवकरच रिलिज होणार असून त्या दृष्टीने उभयतांनी प्रमोशनमध्ये थोडी कसर सोडलेली नाही. या दोघांनी रिक्षाने जुहू बीच गाठत एका अंदाजात ट्रेलर लाँच केला.

यानंतर सारा अली खान फिल्म फेस्टिलसाठी खाना झाली आणि विकी कौशल आता ‘जरा हटके जरा बचके’ प्रमोशन करण्यासाठी सध्या एकटाच बाहेर पडला आहे. अशाच एका प्रमोशन व्हेंटमध्ये विकी कौशलला बेभान झालेली एक चाहती भेटली आणि यामुळे काही काळ विकी कौशल देखील भांबावून गेला.

एका मॉलमध्ये विकीचा इव्हेंट सुरू असताना ही चाहती संधी मिळताच समोर आली आणि तिने आपण विकी कौशलची फॅन असल्याचे सांगत आपले एकतर्फी प्रेम ही जाहीर केले. तिने विकीबाबत काही अशी वाक्ये वापरली की, अगदी विकी कौशल देखील थक्क झाला. या चाहतीने पुढे तर कहरच केला. ती म्हणाली, या जन्मात कॅटरिना तुझी लाईफ पार्टनर आहे. पण, पुढील जन्मात मला हा सन्मान वा आहे!

Back to top button