ईशा गुप्ताचा कान्स अवतार | पुढारी

ईशा गुप्ताचा कान्स अवतार

पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री ईशा गुप्ता देखील यंदाच्या कान्स महोत्सवात दाखल झाली असून आपला फॅशन सेन्स पुरेपूर झळकेल यावर तिने विशेष भर देण साहजिकच होते. ईशाने फ्रेंस टाकनमध्ये निळ्या रंगातील पोशाखात एन्ट्री केली आणि नंतर यातील काही छायाचित्रे सोशल मीडियावर देखील पोस्ट केली. या फोटोखाली तिने लिहिले, ‘टिफनी ब्ल्यू’!

तिचा ड्रेसच मल्टिकलर बॅग ‘फेंडी’ तर गोल्ड स्ट्रॅपी हाथ हिल्स ‘सोफी वेबस्टर’ पुरस्कृत होते. व्हिक्टर ब्लँकोने केलेल्या स्टाइलमध्ये इशाने मिनिमॅलिस्टिक मेकअपवर भर दिला. ईशाने यापूर्वी कान्स महोत्सवातील पहिल्या दिवशी नाईट पार्टीत सल्ट्री ब्लॅक बॉडीकॉन ड्रेस परिधान करत सर्वाचे लक्ष वेधून घेत होते. नंतर तिने या सर्व सहभाग सोहळ्यातील निवडक छायाचित्रे इन्स्टाग्रामवर पोस्ट केली.

ईशाच्या पहिल्या दिवसातील ब्लॅक आऊटफिटला सिल्व्हर नेक होल्डर स्ट्रप होता, शिवाय सिल्व्हर क्लचही होते. स्मोकी आयशॅडो व सॉफ्ट मेकअप लुकमुळे ती अर्थातच फोकसमध्ये राहिली. त्यापूर्वी तिने थाय-हाय स्लिटमधील व्हाईट गाऊनसह कान्समध्ये आपल्या आगमनाची वर्दी दिली. या ड्रेसवर कॉलर व भोवती लेस फ्लावर्स होते.

हिंदी चित्रपटसृष्टीत आपली स्वतःची ओळख प्राप्त करणारी ईशा हिने २००७ साली मिस इंडिया इंटरनॅशनल किताब मिळवला असून जन्नत २ चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये दिमाखात पहिले पाऊल टाकले. याच चित्रपटासाठी तिला सर्वोत्तम पदार्पणाबद्दल फिल्मफेअर अवॉर्ड देखील मिळाला आहे.

Back to top button