आलिया भट्ट गिरवतेय कोरियन धडे | पुढारी

आलिया भट्ट गिरवतेय कोरियन धडे

पुढारी ऑनलाईन : बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आलिया भट्ट या कोरियन भाषेचे धडे गिरवत आहे. इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ अपलोड करत तिनेच याबाबत माहिती दिली.

तिने शेअर केलेल्या व्हिडीओत तिला विचारले जाते, कोरियन भाषेत तुम्ही समोरील व्यक्तीला कसे अभिवादन कराल, असा प्रश्न विचारला असता तिने उत्तर दिले, ‘नेयोंगासेयो’ नंतर तिने जाताना बाय असे म्हणण्याऐवजी कोरियन भाषेतील प्रतिशब्द ‘नेयोंग’ असा असल्यानेही सांगितले.

आता आलियाला कोरियन भाषेची अचानक कशी आवड निर्माण झाली, तेही औत्सुक्याचे आहे. आलिया नुकतीच दक्षिण कोरियात पोहोचली असून तिचा या देशातील पहिलाच दौरा आहे. दक्षिण कोरियात आल्यानंतर तिने एक ट्रिट केले. ज्यात ती म्हणाली, आता मी कोरियातील सेऊल येथे पाहोचले आहे. यापूर्वी माझे कोरियाला कधीही येणे झाले नव्हते. इथला वेग, इथल्या लोकांमधील सळसळता उत्साह हे सारे काही घेण्यासारखे आहे. या ट्रिपचा मी निश्चितपणे आनंद लुटणार आहे.

Back to top button