आता बांगलादेशमध्येही ‘पठाण’चे जलवे! | पुढारी

आता बांगलादेशमध्येही ‘पठाण’चे जलवे!

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचे फॅन फॉलोईंग सर्वश्रृत आहे. सध्या बांगला देशमध्येही याची प्रचिती येत आहे. 12 मे रोजी शाहरूखचा ‘पठाण’ चित्रपट बांगला देशमध्ये रीलिज झाला असून बांगलादेशी चाहत्यांनी याला भरभरून प्रतिसाद दिला आहे.

चित्रपटाचे पहिल्या दोन दिवसांचे पूर्ण अ‍ॅडव्हान्स बुकिंग झाले असून बांगलादेशी सिनेमा हॉलमध्ये ‘झुमे जो पठाण’ या गाण्यावर तेथील चाहते नाचत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. शाहरूख खानच्या फॅन पेजने इन्स्टाग्राम व ट्विटरवर अनेक व्हिडीओ शेअर केले असून त्याला असंख्य लाईक्सही मिळत आहेत.

सध्या बांगला देशमधील 41 सिनेमागृहांत हा चित्रपट दाखवला जात असून पहिल्या दिवसात 198 शो शेड्यूल करण्यात आले होते. शाहरूख खानच्या या चित्रपटातील धुवाधार अ‍ॅक्शन चाहत्यांच्या पसंतीला उतरली असून बॉस लेडी दीपिका व अ‍ॅक्शन हिरो जॉन अब्रहम यांचीही बांगलादेशमध्ये क्रेझ आहे.

Back to top button