The Kerala Story : ब्रिटनमध्ये 'द केरळ स्टोरी' चे प्रदर्शन केले रद्द | पुढारी

The Kerala Story : ब्रिटनमध्ये 'द केरळ स्टोरी' चे प्रदर्शन केले रद्द

पुढारी ऑनलाईन डेस्क : अदा शर्मा स्टारस ‘द केरळ स्टोरी’ ( The Kerala Story ) चित्रपट रिलीज होण्याच्या आधीपासून भारतात वादात सापडला होता. यानंतर आता या वादीची ठिगणी युकेमध्ये पडली आहे. ब्रिटीश बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशन म्हणजेच BBFC ने या चित्रपटाला कोणतेही प्रमाणपत्र दिले नसल्याने यावर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे ब्रिटनमध्ये कोणत्याच चित्रपट थिअटरमध्ये चित्रपटाचे स्क्रीनिंग होणार नाही. या घटनेमुळे तेथील चाहते संतप्त झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘द केरळ स्टोरी’ ( The Kerala Story ) या चित्रपटाला BBFC ने प्रमाणपत्र दिले नसल्याने चित्रपटाचे तेथील स्क्रीनिंग थांबविण्यात आलं आहे. हा चित्रपट १२ मे रोजी युकेच्या ३१ सिनेमा गृहांमध्ये हिंदी आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु, सर्व वेबसाइटवर तिकीट विकण्यास बंदी घालण्यात आली आहे. बंदी घातल्याने खरेदी केलेल्या सर्व तिकिटांचे पैसे परत करत चित्रपटाचे लॉन्चिग पुढे ढकलल्याचे चाहत्यांना सांगण्यात आले आहे.

दरम्यान तेथील सलोनी नावाच्या एका महिलेने सिनेवर्ल्ड येथे बुधवारी ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट पाहण्यासाठी ३ तिकिटे खरेदी केली होती, परंतु, शुक्रवारी १२ मे रोजी तिला एक मेल आला. ज्यामध्ये असे लिहिले आहे की, ‘प्रमाणपत्र नसल्यामुळे बीबीएफसीने ‘द केरळ स्टोरी’ चे बुकिंग रद्द केले आहे. आम्ही त्यासाठी तुमची तिकिटाची पूर्ण रक्कम परत पाठवत आहोत. गैरसोयीबद्दल क्षमस्व.’ असे सांगितले आहे. तर काही नेटकऱ्यांनी वीकेंडला शनिवार आणि रविवारी चित्रपट पाहण्याची योजना आखली होती. आणि ९५% स्क्रिनिंग पूर्ण झाले होते. मात्र, हा शो रद्द करण्यात आल्याचे सांगितले.

दरम्यान BBFC ने सांगितले आहे की, ‘केरळ स्टोरी ला अजून अधिकृत्त प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे. एज रेटिंग सर्टिफिकेट आणि कंटेंट सल्ला मिळताच हा चित्रपट यूके सिनेमा थिअटरमध्ये दाखवायला सुरुवात होईल.

हेही वाचा : 

Back to top button